adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी

 अंतुर्ली येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी  किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंतुर्ली (...

 अंतुर्ली येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी 


किरण धायले मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) : येथील ज्ञानदेव सार्वजनिक वाचनालयात क्रांतिसूर्य, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व विचारप्रबोधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष एस. ए. भोंई सर होते. यावेळी नामदेव तुकाराम माळी गुरुजी, काशिनाथ भाऊ जीरे, अनिल वाडीले, राजेंद्र शिरसाटे, शेख भैय्या शेख करीम, किरण धायले, अनिल नावकर, शांताराम महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी “नीतीविना गती गेली, मतीविना नीती गेली, बुद्धीविना वित्त गेले इतके अनर्थ एका अविद्येने केले” या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांना विनम्र अभिवादन केले.

आपल्या विचारातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी शिक्षणाची मशाल पेटवली. स्त्रिया व शोषित घटकांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. जातिव्यवस्था, अंधश्रद्धा व अन्यायकारक परंपरांवर त्यांनी लेखणीद्वारे प्रहार करत समाजजागृती केली.

शेतकरी, कष्टकरी, महिला आणि उपेक्षित बांधवांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजउन्नतीसाठी समर्पित होते, असे वक्त्यांनी नमूद केले.

तसेच, महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या समाधीचा शोध लावला आणि शिवजयंती उत्सव सुरू करण्याची परंपरा रुजवली. त्यांच्या कार्यातून समाजात स्वाभिमान, सन्मान आणि संघर्षाची प्रेरणा निर्माण झाली.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना कोटी कोटी प्रणाम करण्यात आले तसेच त्यांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

No comments