adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमरावतीच्या गुन्हे अन्वेषण पोलीस अधीक्षक पदी; प्रांजली सोनवणे-पोळ यांची पदोन्नतीने नियुक्ती!

 अमरावतीच्या गुन्हे अन्वेषण पोलीस अधीक्षक पदी; प्रांजली सोनवणे-पोळ यांची पदोन्नतीने नियुक्ती!   (पुणे जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिन...

 अमरावतीच्या गुन्हे अन्वेषण पोलीस अधीक्षक पदी; प्रांजली सोनवणे-पोळ यांची पदोन्नतीने नियुक्ती! 


 (पुणे जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तीन पोलीस उपायुक्त्यांच्या पदोन्नतीने बदल्यांचे आदेश सह सचिव सुप्रिया धपाटे यांनी जाहीर केले आहेत. यापुढे पोलीस विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरू होणार आहे.  कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरांतील प्रांजली सोनवणे-पोळ यांची पदोन्नतीने अमरावती गुन्हे अन्वेषण विभागात पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी यापूर्वी सोलापूर नंदुरबार तर पुणे शहर या ठिकाणी काम पाहिले आहे.  दिपाली मोहन खन्ना कोकण -2 राज्य वार्ता विभाग पोलीस उपायुक्त मुंबई तर प्रांजली नवनाथ सोनवणे-पोळ पुणे शहर ते अमरावती गुन्हे विभाग पोलीस अधीक्षक आणि संदीप गावीत जळगांवच्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. जळगांव अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते पुढील आदेशाप्रमाणे नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. पदोन्नतीने बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ पदभार घेण्याचे आदेश देखील राज्य गृह विभागांच्या सह सचिव सुप्रिया धपाटे यांनी बदल्या आदेशात म्हटले आहे.

No comments