महाराष्ट्रात नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; सातारा सांगली कोल्हापूर जळगांव नवे एसपी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! सौ. अनुजा कारखेले-देव...
महाराष्ट्रात नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; सातारा सांगली कोल्हापूर जळगांव नवे एसपी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!
सौ. अनुजा कारखेले-देवरे ( मुंबई ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्रांच्या पोलीस प्रशासनात कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी पोलीस प्रशासनात मोठा बदल दिसून आला आहे. यामध्ये जवळपास नऊ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये कोणाची कुठे पहा. तुषार दोशी सातारा ते सांगली पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त ते सातारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे सांगली ते मुंबई राज्य गुप्तवार्ता विभाग योगेशकुमार गुप्ता कोल्हापूर ते गडचिरोली पोलीस महानिरीक्षक डॉ.महेश्वरी रेड्डी जळगांव ते गुन्हे अन्वेषण पुणे तर श्रीकांत धिवरे धुळे ते जळगांव पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे पुणे येथून वाशिम येथे पोलीस अधीक्षक यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून तुषार दोशी चांगलेच चर्चेत आले होते. शिवसेनेने त्यांच्या निलंबनाची मागणी देखील केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या बदलीचे आदेश नव्याने काढण्यात आले असून त्यांना सांगली पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

No comments