adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

व्यवसायांच्या गरजा लक्षात घेवून पायाभूत सुविधांची निर्मिंती करावी :- महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश; मला कामात दिरंगाई चालणार नाही!

 व्यवसायांच्या गरजा लक्षात घेवून पायाभूत सुविधांची निर्मिंती करावी :- महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश; मला कामात दिरंगाई चालणार नाह...

 व्यवसायांच्या गरजा लक्षात घेवून पायाभूत सुविधांची निर्मिंती करावी :- महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश; मला कामात दिरंगाई चालणार नाही! 


( मुंबई ) रणजित मस्के प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुंबई महानगरपालिकेचा अश्विनी भिडे यांनी आयुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून शहरांच्या विकासासाठी ॲक्शन मोडवर आहेत. त्यांच्या नव्याने झालेल्या इंट्रीमुळे पालिकेतील कर्मचाऱ्यांना देखील धास्ती लागून आहे. मुंबई महापालिका आयुक्त पदांसाठी जवळपास तीन बड्या आयएएस अधिकाऱ्यांची नावे फिल्डवर होती. अखेर आश्विनी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून या पदाला मान्यता देण्यात आली आहे. सध्या मुंबईत ऑनलाइन खाद्यपदार्थ विक्री गिंग वर्कर्स आदीं नवनवीन क्षेत्रे उदयास आली आहेत. ठीकठिकाणी डिलिव्हरी पॉईंट्स उभारले जात आहेत. त्यामुळे योजना करताना केवळ पारंपारिक बाबींचाच विचार न करता या नवनवीन व्यवसाय किंवा क्षेत्रांना महानगरपालिकेकडून संरचनात्मक साह्य देण्यासाठी सोयी सुविधांची निर्मिंती करण्याकडे भर द्यायला हवा मुंबईतील व्यवसायांच्या गरजा लक्षात घेवुन पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भर द्यावा: असे आदेश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यंत्रणाना दिले आहेत. महानगरपालिकेच्या सर्व विभागांची मासिक आढावा बैठक सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी भिडे बोलत होत्या. महानगरपालिकेतील मुंबईत अनेक मोठे प्रकल्प विकास कामे हाती घेतली आहेत. यामध्ये विविध प्रकल्पांच्या यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रेणांशी योग्य समन्वय ठेवून अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण बाबींचा आढावा घेण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्यांत दर शनिवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. विविध सोयी सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांची सद्यस्थिती जाणून जीआयसारखा तंत्रज्ञानाच्या साह्याने त्याची स्थाननिश्चिती करावी सुविधांची आरक्षित भूखंडांबाबत समग्र धोरण तयार करावे असेही नमूद करण्यात आले आहे.

No comments