adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संजीता महापात्र सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त, प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव!

 संजीता महापात्र सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त, प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव!  सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी (संपादक...

 संजीता महापात्र सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त, प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव! 


सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र शासनाकडून गुरुवारी सायंकाळी जवळपास 25 बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून. सांगली-मिरज कुपवाड चे महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर  अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या संजीता महापात्र आता सांगली-मिरज कुपवाडच्या महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त पदाची त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 2020 च्या बॅचच्या तुकडीतील महिला आयएएस अधिकारी आहेत. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव अशी त्यांची प्रशासकीय खात्यात ओळख आहे.  अमरावती जिल्ह्यात विविध विकासकामे आणि प्रशासकीय बाबींमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका ठरली. त्यांच्या शिस्तबद्ध आणि कार्यक्षम कार्यशैलीची प्रशासकीय वर्तुळात चर्चा असते. त्यांच्या रिक्त जागेवर सत्यम गांधी म्हणून अमरावतीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. संचिता महापात्र सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि आयुक्त संजीता महापात्र हे जिल्ह्याला नव्याने मिळालेले आहेत. सत्यम गांधी आणि संजीता महापात्र यांच्यात शासनाकडून विशेष म्हणजे अदलाबदल झाली आहे. नव्या आयुक्तांकडून शहरांतील कामांना गती मिळेल अशी अपेक्षा आता सांगलीकरांतून होत आहे.

No comments