कॅन्सरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार; चोपड्यात नोंदणीचे आवाहन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- जन मान...
कॅन्सरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार; चोपड्यात नोंदणीचे आवाहन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशंट हेल्प सेंटरतर्फे कॅन्सरग्रस्त गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या १० वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू असून, यंदाही चोपडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणारे कॅन्सरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थी पात्र राहणार आहेत. संबंधित कुटुंबांनी आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशंट हेल्प सेंटरकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही अडचण असल्यास खालील हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक :
राज मोहम्मद खान शिकलगर – 9665195692 / 7020055760
देवेंद्र भास्कर पाटील (केंद्र प्रमुख, नागलवाडी) – 9420198090
मिलिंद पाटील (विशेषतज्ञ, प. स. चोपडा) – 9403482575
एजाज खाटिक – 9284066986
सदर नोंदणी १५ मे २०२६ पर्यंत करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर यांनी केले आहे.

No comments