adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक कला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात चोपड्याच्या अनिलराज पाटील यांची चित्रकृती निवड

 जागतिक कला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात चोपड्याच्या अनिलराज पाटील यांची चित्रकृती निवड  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 जागतिक कला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात चोपड्याच्या अनिलराज पाटील यांची चित्रकृती निवड 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:-  Arizona (अमेरिका) येथील CEV Art Gallery तर्फे दरवर्षी जागतिक कला दिनानिमित्त ऑनलाईन स्वरूपात विनामूल्य कला स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत जगभरातील नामांकित कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश केला जातो. यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात चोपडा येथील चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या चित्रकृतीची निवड करण्यात आली आहे.

अनिलराज पाटील यांनी सादर केलेल्या या चित्रात पर्यावरणाचा समतोल प्रभावीपणे दर्शविण्यात आला आहे. जलरंग (पारदर्शक रंग) माध्यमातून साकारलेली ही कलाकृती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या यशाबद्दल आर्ट गॅलरीच्या चाँट्टेल फुल्लचे यांनी ई-मेलद्वारे ‘अवॉर्ड अचिव्हमेंट सर्टिफिकेट’ प्रदान करून शुभेच्छा दिल्या.

अनिलराज पाटील हे नियमितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवत असतात. त्यांच्या या यशामागे मा. प्राचार्य राजेंद्र महाजन तसेच कला शिक्षक राजेंद्र जावळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी देखील त्यांच्या तीन चित्रकृतींची निवड या प्रदर्शनासाठी झाली होती. या उल्लेखनीय यशाबद्दल अनिलराज पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments