खडसे महाविद्यालयात पंधरा दिवसीय बॅडमिंटन कोचिंग कॅम्प सुरू प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर :- मुक्ताई...
खडसे महाविद्यालयात पंधरा दिवसीय बॅडमिंटन कोचिंग कॅम्प सुरू
प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर :- मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ (मंगळवार) पासून क्रीडा विभागामार्फत पंधरा दिवसीय बॅडमिंटन कोचिंग कॅम्पची उत्साहात सुरुवात झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये बॅडमिंटन खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळाबाबत सखोल ज्ञान मिळावे तसेच त्यांच्या आत्मविश्वासात वाढ व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ होण्यासही मदत होणार आहे. या शिबिरात मार्गदर्शनासाठी बॅडमिंटनपटू ओम तळले यांची उपस्थिती लाभत असून ते खेळाडूंना बॅडमिंटन खेळाची मूलभूत माहिती, इतिहास, मैदानाची रचना, आवश्यक साहित्य, विविध कौशल्ये, तंत्र, डावपेच तसेच नियम यांचे सविस्तर मार्गदर्शन करत आहेत. तसेच खेळाडूंना प्रत्यक्ष सरावाचाही अनुभव देण्यात येत आहे. या शिबिराचे आयोजन मा. प्राचार्य प्रो. डॉ. एच. ए. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले आहे. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयीची आवड वाढून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

No comments