adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्ह्यातील बुवा, बाबा मांत्रिक यांची माहिती पाठवण्याचे आवाहन

  जिल्ह्यातील बुवा, बाबा मांत्रिक यांची माहिती पाठवण्याचे आवाहन    भरत कोळी प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर...

 जिल्ह्यातील बुवा, बाबा मांत्रिक यांची माहिती पाठवण्याचे आवाहन  

भरत कोळी प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुणानंतर महाराष्ट्रात जादूटोना विरोधी कायदा मंजूर झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिले राज्य ठरले. याच महाराष्ट्रात अध्यात्म देव धर्माच्या आडून भविष्य, फल ज्योतिष, ग्रहांची पीडा, अज्ञातांची भीती, पूजा मंत्र तंत्र, करणी, भानामती, आशा मार्गांनी इच्छित फलप्राप्तीचा दावा करून आक्टोपसच्या हजारो हाता प्रमाणे बुवाबाजी फोफावत चालली आहे. त्यात सामान्य माणसापासून ते उच्चपदस्त लोकांसह राजकारणीही खूप मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. यातून लोकांची आर्थिक, मानसिक तसेच महिलांचे लैंगिक शोषण केल्याची असंख्य प्रकरणे उघड होत आहेत.

          या पार्श्वभूमिवर *जळगाव* जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या भागात, परिसरात आशा प्रकारचे भोंदू बुवा बाबा, मांत्रिक, अम्मा असतील तर त्यांचे संपूर्ण नाव, वय, बघण्याचे ठिकाण, कोणत्या वारी पाहतो, कोणकोणत्या समस्येवर पाहतो, काय उपचार करतो, मोबदला रोख वा वस्तूरूप काय घेतो? पावती देतो का? मंदिर असेल तर ते धर्मादाय कडे नोंदणीकृत आहे का? किती लोक येतात अशी माहिती लिखित स्वरूपात आपल्या मोबाईल नंबरसह पुढील  प्रल्हाद रामधन बो-हाडे, अभिजीत निवास, सुपारी बाग जामनेर ता. जामनेर जि. जळगाव ४२४२०६, मो. 9422494931 या पत्यावर पोस्टाने पाठवावी किंवा प्रत्यक्ष आणून द्यावी. 

           माहिती पाठवणाऱ्यांचे नाव पूर्णपणे गुप्त राहील. समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून आपण हे करावे असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments