adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

२१ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा; जळगावात १२ हजार कर्मचारी सहभागी होणार

  २१ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा; जळगावात १२ हजार कर्मचारी सहभागी होणार   जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव : राज्य सरक...

 २१ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा; जळगावात १२ हजार कर्मचारी सहभागी होणार  


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती शाखा-जळगाव तसेच राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांच्या वतीने प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपात जिल्हाभरातून सुमारे १२ हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

सदर संपाच्या पार्श्वभूमीवर २१ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध विभागांतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार असल्यामुळे शासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संपासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मगन पाटील, सरचिटणीस योगेश नन्नवरे, कार्याध्यक्ष वासुदेव जगताप, कोषाध्यक्ष घनश्याम चौधरी, उपाध्यक्ष तथा राज्य संघटक अमर परदेशी, तसेच उपाध्यक्ष दिपक चौधरी, हर्षल दांडेकर, घनश्याम सानप यांचा समावेश होता. यावेळी श्री मराठे, श्रीमती कविता पाटील, अनिता सोमवंशी, शुभांगी बिऱ्हाडे, स्मिता महाजन, वृंदा पाटील, वर्षा तायडे, जिज्ञा भारंबे, मनीषा पारधी, सुप्रिया म्हस्के, माधवी परमसागर यांच्यासह विविध खातेनिहाय संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, अन्यथा बेमुदत संप अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments