adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रामपूरा वॉर्ड क्र. ३, चोपडा येथे नवीन अंगणवाडी केंद्रास मंजुरीचा प्रस्ताव सादर हेमकांत गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश

 रामपूरा वॉर्ड क्र. ३, चोपडा येथे नवीन अंगणवाडी केंद्रास मंजुरीचा प्रस्ताव सादर  हेमकांत गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश  चोपडा | प्रतिनिधी...

 रामपूरा वॉर्ड क्र. ३, चोपडा येथे नवीन अंगणवाडी केंद्रास मंजुरीचा प्रस्ताव सादर 

हेमकांत गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश 


चोपडा | प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहरातील रामपूरा वॉर्ड क्रमांक ३ येथे नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करण्याबाबत महत्त्वपूर्ण प्रशासकीय हालचाल झाली असून, यासंदर्भात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी जळगाव उत्तर (भुसावळ) यांनी आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, रामपूरा वॉर्ड परिसरात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मा. सहआयुक्त (विकास) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या पत्रांचा दाखला देण्यात आला आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, श्री हेमकांत बळीराम गायकवाड यांनी केलेल्या तक्रार अर्जानुसार रामपूरा वॉर्ड क्र. ३, चोपडा शहर येथे नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने संबंधित परिसराची अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून पाहणी केली.

या पाहणीत संबंधित भागात नवीन अंगणवाडी केंद्राची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले असून, तेथे केंद्र सुरू झाल्यास परिसरातील लहान मुलांना व लाभार्थ्यांना अंगणवाडी सेवा सहज उपलब्ध होणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे संबंधित ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करण्याबाबत आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे रामपूरा वॉर्डातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच नवीन केंद्र सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments