"संविधानामुळेच मला ही वर्दी मिळाली!" – पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांनी व्यक्त केली कृतज्ञता.. धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रायसिंग...
"संविधानामुळेच मला ही वर्दी मिळाली!" – पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांनी व्यक्त केली कृतज्ञता..
धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रायसिंग
मो.८९९९८३८६५१
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरपूर - विश्ववंदनीय , वीजनिर्मितीचे जनक , जलतज्ञ , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , विश्वरत्न , विश्वभूषण , महामानव , बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्तर महाराष्ट्रातील शिरपूर शहरात सर्वात मोठी जयंती साजरी केली जाते. त्याच अनुषंगाने आज दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजता शिरपूर येथील पंचायत समिती सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची (Peace Committee) शिरपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक किशोर परदेशी यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर " या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी बोलत होते की, विश्वरत्न , महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिखित भारतीय संविधानामुळे आणि त्यांच्या पुण्याईमुळेच आज मला ही खाकी वर्दी परिधान करून समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे," असे भावूक आणि प्रेरणादायी आपले मत मांडून शांतता समितीमध्ये जमलेल्या समस्त आंबेडकरी समाजाचे मने जिंकली.
तसेच पोलीस निरीक्षक परदेशी पुढे म्हणाले की, भारतीय संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकारामुळेच सामान्य घरातील व्यक्ती उच्च पदावर पोहोचू शकतो मग ती स्त्री असो की पुरुष असो, जयंती उत्सव साजरा करताना आपण सर्वांनी बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवला पाहिजे. उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन येत्या जयंती उत्सवाच्या नियोजनाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून आदर्श पद्धतीने मिरवणुका आणि कार्यक्रम साजरे करावेत. असे पोलीस प्रशासन जनतेच्या सुरक्षेसाठी २४ तास सदैव तत्पर असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच उत्सव कृती समितीचे अध्यक्ष रोशन थोरात यांनी आपले मत मांडताना शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित मान्यवरांना माहिती दिली की, भारत देशातील भारतीय स्त्रियांचे उद्धारक , विश्वरत्न , महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणून साजरी केली जाते. यावर्षीची जयंती अधिक शिस्तबद्ध, भव्य आणि सुरक्षित पद्धतीने साजरी करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जयंती 'विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव कृती समिती' शिरपूर सज्ज झाली आहे. जयंती उत्सवावर देखरेख ठेवण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी समितीमार्फत ६५ सदस्यांची विशेष टीम तैनात करण्यात येणार आहे. याबाबत आपले मत मांडताना उत्सव कृती समितीचे अध्यक्ष रोशन थोरात म्हणाले की, बोधिसत्व "डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर अवघ्या मानवतेचे नेते आहेत. त्यांच्या जयंती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुणांना उत्सव शांततेत साजरा करता यावा, यासाठी आम्ही कंबर कसली आहे. ६५ सदस्यांची ही टीम शहरातील प्रमुख मार्गांवर, मिरवणुकीत आणि मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करेल."
पुढे बोलताना थोरात म्हणाले, "युवा पिढीने महापुरुषांच्या विचारांचा वारसा चालवताना शिस्तप्रिय आचरण ठेवणे गरजेचे आहे. यावर्षी जयंतीमध्ये केवळ देखावे नसून आंबेडकरी विचारांचा जागर असेल. समाजबांधवांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यात सहकार्य करावे, असे आवाहन मी समितीच्या वतीने करतो."जयंती उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील असल्याचेही रोशन थोरात यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी बोलताना सुनिल बैसाणे म्हणाले की, "जयंतीचा उत्साह मोठा असतो, त्यामुळे मिरवणुकीच्या नियोजित वेळेत थोडा-फार बदल किंवा मागे-पुढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करावे. उत्सवाचे स्वरूप भव्य असल्याने समन्वयाने काम केल्यास कोणताही अडथळा येणार नाही." तर प्रा.शैलेंद्र सोनवणे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित 'शांतता समितीची बैठक' अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली. याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक किशोर परदेशी,शिरपूर पोलीस प्रशासनातील अधिकारी, विश्वरत्न , महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कृती समितीचे अध्यक्ष रोशन थोरात, उपाध्यक्ष गोल्डी साने, प्रेम सैंदाणे , कार्याध्यक्ष अनिल आखाडे, खजिनदार प्रताप देवरे, प्रसिद्ध प्रमुख नरेंद्र रायसिंग, सचिव गणेश बाशिंगे, पिंटू थोरात असे सर्व पदाधिकारी , आणि उपस्थित समाजातील वरिष्ठ नेते पिंटू शिरसाठ , रमेश वानखेडे, गणेश सावळे, बाबुदादा खैरनार, गोविंदा खैरनार, गौतम थोरात, संतोष थोरात, भूषण गवळे, किरण कढरे , अनिल आखाडे असे विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत मिरवणुकीचे मार्ग, ध्वनिक्षेपकाची मर्यादा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पोलीस निरीक्षकांच्या संवेदनशील आणि संविधानाप्रती असलेल्या आदरामुळे उपस्थित नागरिकांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. शिरपूरमध्ये जयंती उत्सव अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडेल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

No comments