adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती निमित्त सिद्धेश्वरनगर येथील मराठी शाळेत साजरी.

 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती निमित्त सिद्धेश्वरनगर येथील मराठी शाळेत साजरी.  वरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...

 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती निमित्त सिद्धेश्वरनगर येथील मराठी शाळेत साजरी. 


वरणगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अखिल भारतीय समता परिषदेकडून वही व पेन वाटप जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सिद्धेश्वरनगर वरणगाव येथे परिसरातील समाजसेविका सौ. सविताताई माळी यांनी व त्यांचे अखिल भारतीय समता परिषदेचे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सोनिया लोंढे (गायकवाड) आणि सरुबाई वाघमारे, ज्योती गुरव, लक्ष्मीबाई बैरागी,  रिजवानबी फकीर यांनी या शाळेतील पाचवी ते सातवी वर्गातील मुलींना वही व पेन वाटप केले. यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिरावांच्या कार्याचा गौरव करताना मुलींनी शिक्षण करणे ही काळाची गरज असून आपण फक्त चूल व मूल यात गुंतून राहू नये. अशा शब्दात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष सविता माळी यांनी केले होते. याप्रसंगी जळगांव येथील उप कोषागार अधिकारी रवींद्र गायकवाड व इतर कार्यकत्यांनी प्रयत्न केले. तसेच यावेळी सूत्रसंचालन अनिल देशपांडे यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद खैरे सर,  रमाकांत पाटील, विनय भोगे, भारती अवचारे, श्याम हेरोळे, शारदा सुरवाडे उज्वला धांडे, शुभांगी देबाजे आदी सर्व शिक्षक उपस्थित होते.

No comments