चोपडा “अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १००% निकाल. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठ (DB...
चोपडा “अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १००% निकाल.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे अंतर्गत कार्यरत “महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा” या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम सत्राचा निकाल दिनांक १७/०४/२०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या निकालात महाविद्यालयाने १००% निकालाची उज्ज्वल कामगिरी नोंदवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामध्ये विशेषतः संगणक अभियांत्रिकी विभागाने घवघवीत यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. संगणक विभागातील शिंदे भुमिका प्रदीप हिने ८.९३ SGPA मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, पाटील रुचिता भाऊसाहेब आणि तांबट भूमिका नंदलाल या दोघ विद्यार्थीनिनी ८.४५ SGPA मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व माळी धनश्री अशोक हिने ८.४० SGPA मिळवत तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांबरोबरच सर्व प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनामुळे हा उत्कृष्ट निकाल साध्य झाला. तसेच अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश मिळाले.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.व्ही.एन.बोरसे, प्रा.एम.एस.पाटील अभियांत्रिकी समन्वयक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. प्राचार्य म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या मेहनतीला व शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला मिळालेला हा योग्य सन्मान आहे.”तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवावी, अशा शुभेच्छा दिल्या.संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उल्लेखनीय यशाचे विशेष कौतुक केले.”व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.”
No comments