देवणी पं.स.चा प्रभारी राज संपला! कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी रुजू अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समितीच्या उपोषणाची दखल देवणी येथे गटशिक्षणिधिकारी...
देवणी पं.स.चा प्रभारी राज संपला! कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी रुजू
अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समितीच्या उपोषणाची दखल
देवणी प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
देवणी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय शिंदाळकर यांच्या कार्यपद्धती विरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवस आमरण उपोषण केले त्या उपोषणाची दखल दादासाहेब वानखेडे अप्पर आयुक्त यांनी घेतली. प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय शिंदाळकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू होते. जिल्हा परिषद शाळांमधील काही मुख्याध्यापकांना हाताशी धरून शालेय पोषण आहार / खिचडी निधीमध्ये अनियमितता, कामचुकार शिक्षक व मुख्याध्यापकांना पाठीशी घालणे, नागरिक व पालकांशी उद्धट वर्तन, मुख्याध्यपका विरुद्ध आलेल्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष असे प्रकार सातत्याने घडत होते. व इतर शैक्षणिक बाबींसाठीच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसेच कामचुकार मुख्याध्यापक व शिक्षकांना पाठीशी घालून गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याची जनतेतून चर्चा होत आहे. शिक्षण विषयक तक्रारी केल्या असता संबंधित प्रभारी गटशिक्षणाधिकारी नागरिकांशी उर्मट व उद्धट भाषेत बोलतात, फोन उचलत नाहीत तसेच दोषी मुख्याध्यापक व शिक्षकांना अभय देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत होते.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील कागदपत्रांचे ऑडिट करण्याची, दोषी आढळल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची आणि देवणी पंचायत समितीत कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली होती. शिक्षण विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे 20 एप्रिल 2026 रोजी पासून दोन दिवस बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले सदर उपोषणाची दखल दादासाहेब वानखेडे अप्पर आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांनी घेऊन लेखी प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याने प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय शिंदाळकर यांची देवणी पंचायत समिती येथून जिल्हा परिषद बीड येथे बदली करण्यात आली व देवणी येथे कायमस्वरूपी निवृत्त मारुती जाधव यांची नियुक्ती करण्यात आली ही माहिती अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिली

No comments