adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उपजिल्हा रुग्णालय चोपडा तथा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात "हिवताप दिवस" साजरा

उपजिल्हा रुग्णालय चोपडा तथा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात  "हिवताप दिवस" साजरा  उप जिल्हा रुग्णालय चोपडा चोपडा प्रतिनिधी (संपादक ...

उपजिल्हा रुग्णालय चोपडा तथा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात  "हिवताप दिवस" साजरा 

उप जिल्हा रुग्णालय चोपडा

चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज जागतिक हिवताप (मलेरिया) दिनाचे अवचित्य साधून... जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रमोद यशवंतराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार, व तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी-डॉ.गिरीश गोसावी व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक-डॉ.प्रसाद पाटील, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र चोपडा चे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली. शहरी तथा नागरी भागातील सर्व आरोग्य केंद्राअंतर्गत गावांतील जनतेला हिवताप या आजाराविषयी आरोग्य शिक्षण तथा त्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने. आज दिनांक-25 एप्रिल 2026 रोजी हिवताप दिनाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथील उपस्थित सर्व बाह्य रुग्णांना वैद्यकीय अधिकारी- सौ.डॉ.निलिमा देशमुख यांनी, तसेच नागरी आरोग्य केंद्रात उपस्थित सर्व बाह्य रुग्णांना, तालुका हिवताप पर्येंवेक्षक-जगदीश बाविस्कर यांनी हिवताप आजारा विषयी जनजागृतीपर... सखोल मार्गदर्शन तसेच आरोग्य शिक्षण दिले, किटकामार्फत पसरणाऱ्या आजारात आपल्या महाराष्ट्रात हिवतापाचे दोन प्रकार आढळून येतात (प्लास्मोडियम व्हायव्याक्स आणि प्लाज्मोडियम फॅलसीफेरम)या व्यतिरिक्त मलेरी आणि ओवेल हे आणखी दोन मलेरियाचे प्रकार आहेत परंतु ते महाराष्ट्र राज्यात आढळत नाहीत. डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंगू, चिकनगुनिया हत्तीरोग हे देखील महाराष्ट्रात आढळून येतात. डेंगू,चिकनगुनिया हे आजार एडिस इजिप्ती नावाच्या डासांच्या मादी पासून पसरतात आणि हत्तीरोग हा आजार क्युलेक्स डासाच्या मादी पासून पसरतो. भारतात दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो.सन 2010 पासून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या या दिवसाचा मुख्य उद्देश पावसाळा सुरू होण्यापूर्वी डासांची पैदास कमी करणे हा आहे. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून त्याचे चार प्रकारचे serotype असतात. हत्तीरोग बुचेरीया बँकक्रॉफ्टी या रोग जंतू पासून पसरतो. या सर्व आजारांवरील नियंत्रणाचा प्रभावी उपाय म्हणजे "डास उत्पत्ती प्रतिबंध" त्यासाठी त्यांचे जीवनचक्र खंडित करणे आवश्यक आहे. 

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-चोपडा
 (नगरपालिका दवाखाना-चोपडा)

डासाच्या जीवनचक्र मधील प्रथम तीन अवस्था पाण्यात असतह अंडी, अळी आणि कोश या अवस्था साधारण सात दिवस असतात त्यानंतर पूर्ण प्रौढ डास हवेत संचार करतो सुमारे चौदा दिवस त्यांचे आयुष्य असते. नर डास पान आणि फुले यांच्या रसावर जगतो परंतु मादी डास नवीन अंडी घालण्यासाठी रक्त आवश्यकता असते म्हणून मानवास चावते त्यावेळी एखाद्या रोगी व्यक्तीला चावल्यावर रोगजंतू मादी डासाच्या शरीरात प्रवेश करतात त्यानंतर दुसऱ्या निरोगी व्यक्तीस चावा घेताना प्रथम मानवी शरीरात रोगजंतू  सोडते अशाप्रकारे डास मार्फत ह्या वरील प्रमाणे प्रसार होतो. म्हणून पाण्यातील जीवनचक्र खंडित करण्यासाठी आपण आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला तर डास उत्पत्ती थांबेल हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे सौ.डॉ.निलमा देशमुख यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. उपजिल्हा रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्र चोपडा येथे जागतिक हिवताप दिवस 2026 साजरा करीत असताना, उपजिल्हा रुग्णालय चोपडाचे अधीक्षक- डॉ.प्रसाद पाटील, नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धार्थ साळुंखे, स्त्रीरोग तज्ञ-डॉ. चंद्रहास पाटील, वैद्यकीय अधिकारी-डॉ. निलिमा देशमुख, डॉ. पवन पाटील, डॉ. स्वप्ना पाटील , तालुका हिवताप पर्येंवेक्षक-जगदीश बाविस्कर, चोपडा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आरोग्य सहाय्यक- विजय देशमुख, शहरी भागातील आरोग्य सेवक-रामुला मडावी, अशोक वारे आदी सर्व आरोग्य कर्मचारी, व आशा सेविका देखील उपस्थिती लावली. आरोग्य सेवक व इतर सर्व कर्मचारी वर्ग, व उपस्थि सर्व आशा सेविका यांनी हिवताप दिवस साजरा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

No comments