चोपड्यातील खून प्रकरणाचा झटपट उलगडा; मुंबईपर्यंत पाठलाग करून रेल्वेमध्येच आरोपी ताब्यात; तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीचा अचूक वापर जळगाव...
चोपड्यातील खून प्रकरणाचा झटपट उलगडा; मुंबईपर्यंत पाठलाग करून रेल्वेमध्येच आरोपी ताब्यात; तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीचा अचूक वापर
जळगाव (प्रतिनिधी) –
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा,जळगाव यांच्या तत्पर तपासामुळे शक्य झाली.दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.०० ते २० एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान, चोपडा-धरणगाव रोडवरील पाटचारीजवळ ही घटना घडली. प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. तारामती नगर, चोपडा) यांचा अज्ञात हत्याराने चेहरा व डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात CCTNS नं.१५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राथमिक तपासात चेतन सुभाष कानडे यांच्या सांगण्यावरून विजय भास्कर वैदकर (रा.भाग्योदय नगर,चोपडा) आणि निर्मल संजय बडगुजर (रा.चिंच चौक,चोपडा) यांनी संगनमताने हा खून केल्याचे निष्पन्न झाले.पूर्व वैमनस्यातून हा गुन्हा केल्याची कबुली आरोपींनी चौकशीत दिली.गुन्हा केल्यानंतर आरोपी मुंबईकडे पळून गेले होते.गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्यांचा माग काढला.आरोपी दादरहून जळगावकडे रेल्वेने येत असल्याची माहिती मिळाली
पोलिस पथक नाशिकहून रेल्वेत बसून शोधमोहीम सुरू केली.नाशिक ते चाळीसगाव दरम्यान चालत्या रेल्वेत आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. सदरची ही यशस्वी कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस अधीक्षक, जळगाव अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच तपास पथकात सोपान गोरे, जितेंद्र वल्टे, रविंद्र पाटील, दिपक माळी, विलेश सोनवणे, विष्णु बिऱ्हाडे,सुनील दामोदरे,रावसाहेब पाटील,रिजवान शेख आदींचा समावेश होता. चोपडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले व चेतन परदेशी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली २४ तासांत गुन्ह्याचा छडा अत्यंत कमी वेळात आरोपींचा माग काढून त्यांना अटक करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. या कारवाईमुळे चोपडा परिसरात निर्माण झालेली भीती कमी झाली आहे.

No comments