महात्मा ते महामानव... एक वैचारिक शोध प्रबोधनाचा प्रभावी कार्यक्रम संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा: – दि. १८ एप्र...
महात्मा ते महामानव... एक वैचारिक शोध प्रबोधनाचा प्रभावी कार्यक्रम संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा: – दि. १८ एप्रिल २००६ रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशतकीय जयंतीनिमित्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “महात्मा ते महामानव... एक शोध” या वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन आक्कासाहेब शरचंद्रिका पाटील नाट्यगृह, चोपडा येथे उत्साहात करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रसिद्ध नाट्यकर्मी शंभु आण्णा पाटील यांनी आपल्या प्रभावी वाणीमधून महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग उलगडून दाखवले. त्यांच्या सादरीकरणातून जोतीराव फुले ‘महात्मा’ आणि डॉ. आंबेडकर ‘महामानव’ कसे बनले, यामागील संघर्ष, विचारसरणी आणि कार्याचा सखोल आढावा उपस्थितांना मिळाला. तसेच शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्वही प्रभावीपणे मांडण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सुनिल पाटील (वाळकी, चोपडा) यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी भूषवले.
यावेळी मा. आमदार बापुसाहेब कैलास पाटील, भैय्यासाहेब संदीप पाटील (अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण संस्था), आण्णासाहेब घनश्याम पाटील (माजी चेअरमन, चो.सा.का), रमेश भाऊ शिंदे (सभापती, नगर परिषद चोपडा), राजू भाऊ देशमुख, प्रवीण बाबा देशमुख, इस्माईल बागवान (नगरसेवक), नंदकिशोर आबा पाटील (माजी सभापती, कृ.उ.बा.), नोमान काझी, संतोष जिभाऊ आहीरे, भैय्या दादा वाडे, गोपाळराव सोनवणे, मिलिंद भाऊ सोनवणे, रवीभाऊ वाघ, जियोद्दीन काझी, जमील कुरेशी, प्रवीण करकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. उमेश मराठे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून वैचारिक प्रबोधनाचा लाभ घेतला.


No comments