adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्ह्यात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

  सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्ह्यात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन लातूर जिल्...

 सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्ह्यात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुढाकाराने १८ एप्रिल रोजी १२ ठिकाणी शिबिरे ;

गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे धिरज विलासराव देशमुख यांचे आवाहन 


लातूर (प्रतिनिधी) :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सहकारमहर्षी माजी मंत्री मा. श्री. दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात भव्य 'मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया' शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध १२ केंद्रांवर हे शिबिर पार पडणार असून, जास्तीत जास्त  नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.

सामाजिक बांधिलकीतून उपक्रम

लातूर जिल्हा बँकेने नेहमीच सामाजिक प्रश्नांवर आपली बांधिलकी जपली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून या आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. वाढत्या वयानुसार निर्माण होणारे दृष्टीदोष आणि मोतीबिंदूच्या समस्यांवर वेळीच उपचार व्हावेत, हा यामागचा मुख्य हेतू आहे.

अशी असतील शिबिराची ठिकाणे :

१८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून खालील ठिकाणी ही शिबिरे सुरू होतील:

1. लातूर ग्रामीण: ग्रामीण रुग्णालय, बाभळगाव.

2. लातूर ग्रामीण: सार्वजनिक स्टेज सभागृह, बोरगाव काळे.

3. लातूर शहर: माता रमाई आंबेडकर रुग्णालय, सम्राट चौक लातूर

4. लातूर शहर: पांडुरंग मंगल कार्यालय, दिपज्योती नगर लातूर

5. रेणापूर: बाजार समिती सभागृह, रेणापूर.

6. औसा: यादव मंगल कार्यालय, बेलकुंड.

7. निलंगा: जिजाऊ चौक, निलंगा.

8. उदगीर: बिराजदार हॉस्पिटल, शाहू चौक उदगीर

9. जळकोट: विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृह, तिरुका.

10. अहमदपूर: ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर.

11. चाकूर: ग्रामीण रुग्णालय, चाकूर.

12. शिरूर अनंतपाळ: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परिसर शिरूर अनंतपाळ

शिबिराची वैशिष्ट्ये:

* तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची मोफत तपासणी.

* तपासणीनंतर गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप.

* मोतीबिंदू आढळून आलेल्या रुग्णांवर पुढील शस्त्रक्रिया मोफत केली जाणार.

सहभागाचे आवाहन:

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्णांना डोळ्यांच्या उपचारासाठी शहरात येणे अनेकदा शक्य नसते. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे. लातूर जिल्हा बँकेच्या वतीने सर्व शाखा आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत या शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या जवळच्या शिबिर केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेच्या संचालक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरीकांनी सदरील शिबाराचा लाभ घेण्यासाठी पुढील पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा


लातूर ग्रामीण

ग्रामीण रुग्णालय बाभळगाव, ता.जि.लातूर

अॅड.राजकुमार आबासाहेब पाटील 

7588062973, 

श्री गोविंद शेषेराव देशमुख  

9422471328


लातूर ग्रामीण

सार्वजनिक स्टेज सभागृह बोरगाव काळे, ता.जि.लातूर

श्री दिपक काळे

95030 59111

श्री. सतिश काळे 

9860010474


लातूर शहर

माता रमाई आंबेडकर रुग्णालय, सम्राट चौक, लातूर

अॅड.किरण जाधव पा.

9823496000

श्री विजयकुमार साबदे 

9049025000

श्री पृथ्वीराज सिरसाठ

7066901083


लातूर शहर

पांडुरंग मंगल कार्यालय, दिपज्योती नगर, लातूर

श्री पवन सोलंकर

7020824828

सौ.सपना किसवे

9422611100




रेणापूर

बाजार समिती सभागृह, रेणापूर जि.लातूर

अॅड.प्रमोद चंद्रकांत जाधव  

9049951000

श्री.प्रमोद बाळासाहेब कापसे  

94039 40586


औसा

यादव मंगल कार्यालय, बेलकुंड ता.औसा, जि.लातूर

श्री शामबापू भोसले 

9623356111

श्री सचिन पाटील

9421095535


निलंगा

जिजाऊ चौक, निलंगा जि.लातूर

श्री अभय साळुंके 

9850791999,

श्री विजयकुमार पाटील

9960888903


उदगीर

बिराजदार हॉस्पिटल, शाहू चौक, उदगीर,जि.लातूर

श्री कल्याण पाटील

9923100924

श्री संतोष बिराजदार

9689295441

जळकोट

विठ्ठल रुक्मिीणी मंदिर सभागृह, तिरूका ता.जळकोट, जि.लातूर

श्री मारूती पांडे

9922397468


अहमदपूर

ग्रामीण रुग्णालय, अहमदपुर, जि.लातूर

श्री चंद्रकांत मद्दे

9423077549,

श्री निलेश देशमुख

9421358635

9309838757


चाकूर

ग्रामीण रुग्णालय, चाकुर ता.चाकुर जि.लातूर

श्री एन.आर.पाटील 

9823955000,

श्री अनिल चव्हाण

9422371717


शिरूर अनंतपाळ

जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक, शिरुर अनंतपाळ, जि.लातूर

श्री अनुप शेळके

9923323999,

श्री आबासाहेब पाटील 

9577839999

No comments