adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गायीला सेवा, सुरक्षा व सम्मान मिळावी यासाठी २७ एप्रिल रोजी महा शोभा यात्रेचीं जय्यत तयारी

 गायीला सेवा, सुरक्षा व सम्मान मिळावी यासाठी २७ एप्रिल रोजी महा शोभा यात्रेचीं जय्यत तयारी  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोप...

 गायीला सेवा, सुरक्षा व सम्मान मिळावी यासाठी २७ एप्रिल रोजी महा शोभा यात्रेचीं जय्यत तयारी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा-देशात गो सम्मान आवाहन अभियान देशाभरातील सर्व संतांनी हाती घेतले आहे. संतांच्या आदेश लक्षात घेऊन चोपडा येथील गो भक्तांनी 27 एप्रिल हा दिवस गो सम्मान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. दि. 1एप्रिल 2026 रोजी गोभक्तांची बैठक मोठ्या उत्साहात श्रीराम नगर येथे संपन्न झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन 27एप्रिल रोजी दहा हजार सह्यांचे निवेदन राज्य व केंद्र सरकार तथा राष्ट्रपती महोदय यांना म. तहसीलदार साहेब यांचे मार्फत मागाण्यांचे निवेदन प्रार्थना पत्र देण्यात येणार आहे प्रार्थना पत्रात गायीला राष्ट्रामातेचा दर्जा द्यावा या मागणी सोबत गो हत्या बंदीचा कडक कायदा लागू करा व गायीची सेवा व्हावी म्हणून उचित न्याय व्हावा अशा मागण्या असतील. सदरील प्रार्थना पत्र देण्यासाठी दि 27एप्रिल 2026रोजी श्रीराम मंदिर गांधीजी चौक चोपडा येथे सकाळी गोसेवक, संत, शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहतील. भजन कीर्तन करत जय गोमाता जय गोपाल असा गजर करत चोपडा शहरातील बाजारपेठेतून मार्गक्रमण करत म. तहसीलदार कचेरीत शोभा यात्रा पोहचून प्रार्थना पत्र देतील. बैठकीत के डी चौधरी, लखन तेली, डी व्ही पाटील,कोळी अप्पा,सतीश पाटील, टी एम चौधरी,राजू बडगुजर,देवकांत के चौधरी, जयदेव देशमुख, किरण चौधरी, रवी पाटील, प्रा सूर्यकांत चौधरी, श्रीराम नगर भागातील महिला वर्ग धनराज मराठे आदी गोभक्त उपस्थित होते. शोभा यात्रेच्या तयारीसाठी 7एप्रिल रोजी गोभक्तांची मिटिंग गांधीजी चौकातील श्रीराम मंदिर चोपडा येथे साय 6वाजता होणार असून या बैठकीला गोभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्तित राहावे असे आवाहन गो भक्तांद्वारे करण्यात आले आहे मिटिंग नंतर याभागात महिला पुरुष मुले यानी अभियान गीत गायले. टी एम चौधरी यांनी अभियानाची माहिती देत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. सर्व गो भक्तांना माँ कर्मा देवी ट्रस्ट दिल्ली द्वारे महाराष्ट संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवकांत के चौधरी यांनी फ्रुट जूस देऊन आभार म्हणालेत

No comments