adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हरविल्याची तातडीची सूचना : ८५ वर्षीय वयोवृद्ध बेपत्ता

  हरविल्याची तातडीची सूचना : ८५ वर्षीय वयोवृद्ध बेपत्ता  अमोल बावस्कार |बुलढाणा (संपादक|हेमकांत गायकवाड) अकोला : शहरातील अनंत नगर परिसरातून ...

  हरविल्याची तातडीची सूचना : ८५ वर्षीय वयोवृद्ध बेपत्ता 


अमोल बावस्कार |बुलढाणा

(संपादक|हेमकांत गायकवाड)

अकोला : शहरातील अनंत नगर परिसरातून एक 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वामनराव पांडुरंग गोतमारे (वय 85 वर्षे), रा. अनंत नगर, शिवसेना वसाहत रोड, जुने शहर, अकोला हे दि. 16 एप्रिल 2026 रोजी घरातून कोणालाही न सांगता निघून गेले असून त्यानंतर ते परत आलेले नाहीत. याबाबत त्यांचे पुत्र राजेश वामनराव गोतमारे यांनी दि. 21 एप्रिल 2026 रोजी जुने पोलीस स्टेशन, अकोला येथे हरवल्याची तक्रार नोंदवली आहे.

वर्णन पुढीलप्रमाणे :

उंची : सुमारे 5 फूट 5 इंच

रंग : गोरा

केस : पांढरे

अंगात : पांढरा शर्ट व पांढरी पॅन्ट

सदर व्यक्ती कोणाला आढळल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

📞 संपर्क :

राजेश गोतमारे : 9960298715

पोलीस अधिकारी वीरेंद्र खेर्डे : 8208145044

अकोला पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित कळवावी, असे सांगण्यात आले आहे.

No comments