adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने वृद्धांना लुटणारी टोळी जेरबंद; कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 भविष्य सांगण्याच्या बहाण्याने वृद्धांना लुटणारी टोळी जेरबंद; कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत ग...

 भविष्य सांगण्याच्या बहाण्याने वृद्धांना लुटणारी टोळी जेरबंद; कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-  भविष्य सांगण्याचा बहाणा करून ज्येष्ठ नागरिकांना गाठत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना कोतवाली पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे शहरात पोलिसांचे कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी वृद्धांना लक्ष्य केले होते. पहिल्या घटनेत केडगाव येथील संतोष चंद्रसेन गायकवाड (वय ६८) हे २८ मार्च २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसले असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना गाठले. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी २० रुपयांच्या नोटेमध्ये गुंडाळून खिशात ठेवल्याचे भासवून ती लंपास केली. दुसऱ्या घटनेत सावेडी येथील अरुण सहादू निंबाळकर (वय ७४) हे पुणे एसटी स्टँडवर बसची वाट पाहत असताना आरोपींनी त्यांनाही याच पद्धतीने फसवून सोन्याची अंगठी चोरली होती.

या घटनांची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू करून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ७ ग्रॅम व ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४), ३१६(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टीपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड (कोतवाली पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील, तपास अधिकारी म.पो.हे.कॉ. रोहिणी दरंदले यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे, दौंड, दीपक रोहकले तसेच पोलीस कॉन्स्टेबल सत्यम शिंदे, सुरज कदम, सचिन लोळगे, राम हंडाळ आणि राहुल गुंडू (दक्षिण मोबाईल सेल) यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास म.पो.हे.कॉ. रोहिणी दरंदले या करीत आहेत.

No comments