TB मुक्त भारत अभियानांतर्गत हरताळे-सालबर्डी-वढवे येथे मोफत क्ष-किरण तपासणी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (...
TB मुक्त भारत अभियानांतर्गत हरताळे-सालबर्डी-वढवे येथे मोफत क्ष-किरण तपासणी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
(मुक्ताईनगर):- TB मुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत आज दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी हरताळे, सालबर्डी व वढवे या गावांमध्ये जिल्हास्तरीय क्षयरोग पथकाच्या वतीने संशयित नागरिकांची मोफत क्ष-किरण (X-ray) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्या आदेशानुसार, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित घडेकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. हरताळे, सालबर्डी व वढवे येथील एकूण १०० लाभार्थ्यांनी क्ष-किरण तपासणी करून घेतली.
या शिबिरात जिल्हास्तरीय क्ष-किरण अधिकारी राजेंद्र सोनवणे, पर्यवेक्षक विलास पाटील, नीलेश भंगाळे, दयानंद पाटील, दिनेश सूर्यवंशी, मारुती नवराम, पवन चौधरी यांनी सहभाग घेतला. तसेच उपकेंद्र हरताळा येथील वैद्यकीय अधिकारी सुधा बोरोले, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. एहसान खान, एएनएम रिटा सोनवणे, एमपीडब्ल्यू आनंद ठाकरे, रवींद्र कोळी, युसूफ फकीर, गटप्रवर्तक संगीता पंडित, नीलिमा पाटील, तसेच आशा कार्यकर्त्या सुलोचना कोळी, वैशाली निकम, सुनिता वांगेकर, वंदना दांडगे, सुनिता धांडे, सुलभा चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य निरीक्षक विजयकुमार पाटील, दिनेश सूर्यवंशी व इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या मोहिमेमुळे क्षयरोगाच्या लवकर निदानास मदत होऊन “TB मुक्त भारत” या उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे सांगण्यात आले.

No comments