adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कासोदा-वनकोठे रस्त्यावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू , दोघे जखमी

 कासोदा-वनकोठे रस्त्यावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू , दोघे जखमी  कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) :- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तालुक्यातील क...

 कासोदा-वनकोठे रस्त्यावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू , दोघे जखमी 


कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) :-

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

तालुक्यातील कासोदा-वनकोठे रस्त्यावर साई पेट्रोलियम पंप व महादेव मंदिराच्या मध्ये दि.८ एप्रिल बुधवार रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण मोटारसायकल अपघातात एका ५० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहे. मोटारसायकल चालकासह दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत.असून सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०८/०४/२०२६ रोजी रात्री ०९.३० वाजताच्या सुमारास अरुण शांताराम पाटील (वय ५७, रा. वनकोठे) हा त्याच्या ताब्यातील बजाज प्लॅटिना कंपनीची ही मोटारसायकल क्र.MH- १४ BD: ८४२६  भरधाव वेगाने चालवत होता. मोटारसायकलवर मागे दिलीप अशोक पाटील (वय ४४) आणि रमेश नामदेव चव्हाण (वय ५०, मयत) असे दोघे बसलेले होते. कासोदा ते वनकोठे रस्त्यावरून जात असताना साई पेट्रोलियम पंप व महादेव मंदिराच्या मध्ये निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात घातली आणि निंबाच्या झाडाला जोरदार धडक दिली. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नी.श्रीकांत पाटील व पो.कॉ.योगेश पाटील , दीपक देसले , नितीन पाटील , नंदू परदेशी , स्वप्नील परदेशी , लहू हटकर , नरेंद्र पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली.व जखमींना उपचारासाठी रवाना केले. तर मयत इसमास शवविच्छेदनासाठी पाठविले. या अपघातात रमेश नामदेव चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला.तर दिलीप अशोक पाटील व अरुण पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. कासोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(a), १२५(b), ३२४(४) आणि मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.नरेंद्र पाटील करीत आहे.

No comments