सावदा महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न फैजपूर (प्रतिनिधी – इदू पिंजारी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर:- महावितरणच...
सावदा महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न
फैजपूर (प्रतिनिधी – इदू पिंजारी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर:- महावितरणच्या सावदा विभागातील कर्मचाऱ्यांनी मार्च २०२६ मध्ये केलेल्या उल्लेखनीय व अभूतपूर्व कामगिरीच्या पार्श्वभूमीवर कक्षनिहाय कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा फैजपूर येथील शुभ दिव्य हॉलमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला सावदा विभागातील सर्व अभियंते व वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभागातील प्रत्येक कक्षातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी, अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता गणेश महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय पाटील तसेच उपविभाग प्रमुख उपकार्यकारी अभियंते सुहास चौधरी, नितीन पाटील, दिलीप कोल्हे, नितीन सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले. सहाय्यक अभियंता भेरुलाल पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत मार्गदर्शन केले, तर उपकार्यकारी अभियंता दिलीप कोल्हे यांनीही आपले विचार मांडले. अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यकारी अभियंता गणेश महाजन यांनी प्रास्ताविकातून सावदा विभागाची वस्तुस्थिती मांडली. कर्मचारी श्री. मोरे व सौ. तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्य अभियंता मुलानी यांनी सध्याची परिस्थिती व भविष्यातील आव्हानांना तोंड देण्याबाबत मार्गदर्शन करत कर्मचाऱ्यांना प्रेरित केले. त्यांचे भाषण उपस्थितांसाठी उत्साहवर्धक ठरले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक अभियंता पंकज बाविस्कर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भेरुलाल पाटील, देवेंद्र महाजन, गौरव वाघुळदे, तुषार महाजन, मुकेश ठाकरे, चेतन ठाकूर तसेच सर्व सहाय्यक अभियंते व लाईनमन विशाल चौधरी (फैजपूर) यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments