अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी अटकेत चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी अटकेत
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तालुक्यातील एका गावातील शेत परिसरात ही घटना घडली.पीडित मुलगी कामानिमित्त शेतात जात असताना आरोपीने तिच्याशी ओळख वाढवून तिला विश्वासात घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आरोपीने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचेही उघड झाले. काही महिन्यांनंतर आरोपीने पीडितेला सोडून दिल्याने ती आपल्या आई-वडिलांकडे परतली. दरम्यान, दिनांक.०७/०४/२०२६ रोजी पीडितेला प्रसूतीसाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिने एका बाळाला जन्म दिला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला. भारतीय न्याय संहिता कलम १३७(२),६४(१),(२), तसेच इतर संबंधित कलमांखाली आणि बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

No comments