adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जनगणना २०२७: चोपडा शहरात प्रगणक व पर्यवेक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न १ मे ते १५ मे दरम्यान 'स्व-गणना' मोहिमेत सहभागी होण्याचे चार्ज ऑफिसर रामनिवास झंवर यांचे नागरिकांना आवाहन

 जनगणना २०२७: चोपडा शहरात प्रगणक व पर्यवेक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न १ मे ते १५ मे दरम्यान 'स्व-गणना' मोहिमेत सहभा...

 जनगणना २०२७: चोपडा शहरात प्रगणक व पर्यवेक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न

१ मे ते १५ मे दरम्यान 'स्व-गणना' मोहिमेत सहभागी होण्याचे चार्ज ऑफिसर रामनिवास झंवर यांचे नागरिकांना आवाहन 


चोपडा (प्रतिनिधी):

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भारतीय जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यासाठी (घर गणना) चोपडा शहरात जय्यत तयारी सुरू असून २३ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले. चोपडा नगरपरिषदेचे सभागृह, नाट्यगृह आणि जुन्या इमारतीचा वरचा मजला अशा तीन ठिकाणी स्वतंत्र बॅचेसमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

प्रशिक्षणाचा सविस्तर आढावा:

या पहिल्या टप्प्यात एकूण ९३ प्रगणक आणि १४ पर्यवेक्षकांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सखोल प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी शिंदे वाडा, गौतम नगर आणि गणेश कॉलनी या भागात प्रत्यक्ष भेट देऊन 'फिल्ड ट्रेनिंग' देण्यात आले. यामध्ये मोबाईल ॲपद्वारे माहिती गोळा करणे, प्रगणक गटाच्या चतुर सीमा निश्चित करणे आणि संपूर्ण गटाचा नकाशा अचूकपणे रेखाटणे याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.

याकामी फिल्ड ट्रेनर जोगेश शेलार, उपप्राचार्य प्रताप विद्या मंदिर चोपडा, आशिष बडगुजर सर उपशिक्षक, कै ही. मो. करोडपती हायस्कूल, असलम शेख मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल आणि तळेले सर धरणगाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींची गूगल फॉर्म च्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आली.  कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांनी  


सेवाभावाची व गोपनीयतेची प्रतिज्ञा घेतली.

प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना त्यांच्या प्रगणक गटाचे नकाशे, अधिकृत आदेश आणि ओळखपत्रे प्रदान करण्यात आली.  प्रशिक्षणार्थींनी या तीन दिवसांत मिळालेल्या प्रशिक्षण व तांत्रिक माहिती बद्दल समाधान व्यक्त केले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चार्ज ऑफिसर रामनिवास झंवर यांनी जनगणनेच्या कामाचे राष्ट्रीय महत्त्व आणि गांभीर्य अधोरेखित केले. ते म्हणाले की, "जे प्रगणक व पर्यवेक्षक उत्कृष्ट काम करतील, त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. विशेषतः ज्यांच्या भागात नागरिकांकडून 'स्व-गणना' (Self-Enumeration) करण्याचे प्रमाण सर्वाधिक असेल, अशा प्रगणकांना विशेष बहुमान दिला जाईल."

नागरिकांना 'स्व-गणने'चे आवाहन:

रामनिवास झंवर यांनी चोपडा शहरवासीयांना आवाहन केले की, १ मे ते १४ मे २०२६ या कालावधीत होणाऱ्या 'स्व-गणना' मोहिमेत नागरिकांनी स्वतःहून आपली माहिती नोंदवावी. डिजिटल पद्धतीचा वापर करून घरबसल्या माहिती भरल्यास जनगणनेचे काम अधिक अचूक आणि जलद होण्यास मदत होईल. तसेच 15 मे पासून जेव्हा प्रगणक आपल्या घरी माहिती घेण्यासाठी येतील, तेव्हा त्यांना सन्मानाने घरात प्रवेश द्या आणि विचारलेली माहिती अधिकृतपणे व अचूक द्या. प्रगणक हे राष्ट्रीय कार्यासाठी आपल्या दारी येत आहेत, त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. चोपडा शहराच्या भविष्यातील विकासात प्रत्येकाने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे." 


प्रगणकांचा करा सन्मान, शहराच्या विकासात द्या योगदान

पुढील टप्प्यात उर्वरित ७ पर्यवेक्षक आणि ४३ प्रगणक यांचे प्रशिक्षण २७ एप्रिल ते २९ एप्रिल या दरम्यान पार पडणार आहे.

No comments