adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकऱ्यांच्या अश्रूंना मिळणार 'स्वराज्याचा' आधार, मुंडगाव येथे बळीराजा आणि कृषी संचालकांचा सन्मान!

 शेतकऱ्यांच्या अश्रूंना मिळणार 'स्वराज्याचा' आधार, मुंडगाव येथे बळीराजा आणि कृषी संचालकांचा सन्मान!  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -...

 शेतकऱ्यांच्या अश्रूंना मिळणार 'स्वराज्याचा' आधार, मुंडगाव येथे बळीराजा आणि कृषी संचालकांचा सन्मान! 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अकोट / शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावा आणि त्याच्या डोळ्यांतील पाणी पुसले जावे, हेच स्वराज्य पक्षाचे मुख्य ध्येय आहे. जेव्हा-जेव्हा बळीराजावर संकट येईल किंवा त्याच्या हक्कावर गदा येईल, तेव्हा स्वराज्य पक्ष ढाल बनून उभा राहील," अशी भावनिक साद स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी घातली. मुंडगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान मंगल कार्यालयात आयोजित 'शेतकरी व कृषी केंद्र संचालक सन्मान सोहळ्यात' ते बोलत होते. कृषी केंद्र चालक हे केवळ विक्रेते नसून ते शेतकऱ्यांचे संकटातील आधारस्तंभ आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि जाचक सरकारी धोरणांमुळे आज शेतकरी भरडला जात असतांना, कृषी केंद्र चालकांनाही प्रशासकीय त्रासाला सामोरे जावे लागते. या दोन्ही घटकांच्या पाठीशी स्वराज्य पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकरी नेते गजानन बंगाळे पाटील उपस्थित होते.


त्यांनी शेतीसमोरील भविष्यातील आव्हाने मांडून एकजुटीचे आवाहन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भगवानराव पाटील अध्यक्ष, ग्रुप ऑफ महानंदी ॲग्रो जेनेटिक्स, आणि मार्केटिंग मॅनेजर गणेश पाटील यांची उपस्थिती होती. या मान्यवरांनी शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. शिवराम डिक्कर व स्वराज्य मित्र परिवार यांनी या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते. कार्यक्रमाला विजयजी राठी कृषी केंद्र युनियन तेल्हारा तालुका अध्यक्ष, मुरलीधर जळमकार, भिवराजजी हरकंड, सोपान ढोरे, उज्वल पाटील चोपडे, तेजराव लोणे, नितीन आखरे, यांसह परिसरातील शेतकरी व कृषी केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम ईसापुरे तर सुत्रसंचालन राहुल बाहाकर यांनी पाहले, ​हा सोहळा केवळ एक औपचारिक सत्कार न राहता, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा हुंकार ठरला. प्रशांत डिक्कर यांच्या आश्वासक नेतृत्वामुळे उपस्थित सर्वांना एक नवा आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

No comments