जळगाव जिल्हा पिक फेडरेशनच्या व्हॉईस चेअरमनपदी गुलाबराव कदम यांची बिनविरोध निवड धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव:- जळगा...
जळगाव जिल्हा पिक फेडरेशनच्या व्हॉईस चेअरमनपदी गुलाबराव कदम यांची बिनविरोध निवड
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव:- जळगाव जिल्हा सहकारी पिक संस्थांच्या फेडरेशनच्या व्हॉईस चेअरमनपदी सावखेडा (ता. अमळनेर) येथील गुलाबराव दगा कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीवेळी फेडरेशनचे चेअरमन वसंतराव कोल्हे (जळगाव) यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य हारूण देशमुख (उत्राण), संजय पवार (चांदसर बु.), गंगाधर पाटील (पंचक), विजय देशमुख (हातेड खु.), पंडित तेली (पिंपळगाव बु.), राहुल पाटील (भातखंडे बु.), नाना पाटील (कुर्हे प्र. न.), नितीन पाटील (अट्रावल), अविनाश पाटील (सावखेडे सिम), अफसर तडवी (लोहारे), अनिल पाटील (ममुराबाद), सोमनाथ निकम (उंबरखेड), साहेबराव सोनवणे (अडावद), रंजनाबाई अत्तरदे (नांदेड) व लताबाई पाटील (लोण प्र. उत्राण) आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित व्हॉईस चेअरमन गुलाबराव कदम यांचा सावखेडा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या निवडीच्या आनंदात गावात विजयी मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला.

No comments