adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताईनगर प्रवर्तन चौकात नशामुक्त भारत अभियानाचा लोकजागर..!! नशा मुक्ती जनजागृतीसाठी साठी कडाडला वहीगायन लोककलेचा डफ..!!

 मुक्ताईनगर प्रवर्तन चौकात नशामुक्त भारत अभियानाचा लोकजागर..!! नशा मुक्ती जनजागृतीसाठी साठी कडाडला वहीगायन लोककलेचा डफ..!!  प्रा.सतिश गायकवा...

 मुक्ताईनगर प्रवर्तन चौकात नशामुक्त भारत अभियानाचा लोकजागर..!!

नशा मुक्ती जनजागृतीसाठी साठी कडाडला वहीगायन लोककलेचा डफ..!! 


प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर : -ग्रामीण भागात पारंपरिक लोककलांच्या व लोककलावंताच्या माध्यमातून होत असलेली जनजागृती ही लोकभाषा व लोक संवादामुळे प्रभावी ठरत असते त्यामुळे नशा मुक्त भारत अभियानाच्या जनजागृती च्या कार्यात लोककलावंताच्या सहभागातून हे अभियान अधिक परीणाम कारक करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने  नशामुक्त भारत अभियान अंतर्गत लोककलावंत प्रबोधन कार्यशाळा व जनजागृती पर विविध कार्यक्रमांचे आयोजन मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेचा शुभारंभ व जनजागृती स्टाॅल चे उद्घाटन खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध लोककलावंत शाहीर विनोद ढगे होते यांच्या हस्ते करण्यात आले 


नशामुक्त भारत अभियानअंतर्गत मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील वहीगायन,गोधळ, लोककला प्रकारात कार्यरत लोककलावंताचे एकदिवसीय कार्यशाळा, जनजागृती स्टाॅल व चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी जवळपास १५० कलावंतानी या कार्यशाळेत सहभागी होऊन नशामुक्त भारत अभियानाचा आपल्या लोककलतून जागर केला.  मुक्ताईनगर तालुक्यातील शाहीर उत्तम जुंबळ,शाहीर किसन भगवान चव्हाण, भास्कर खुशाल पाटील शाहीर ईश्वर कापसे,व शाहीर संतोष चौधरी  लोक कलाकारांनी नशा मुक्तीवरील गिते सादर केलीत तर जळगाव येथील शाहीर विनोद ढगे व सहकाऱी सचिन महाजन अवधूत दलाल,मोहीत पाटील, संतोष चौधरी अरविंद पाटील यांनी "नशा करी दुर्दशा" पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीर उत्तम जुंबळे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत मधुकरराव भोई यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजना साठी लोककलावंत शाहीर उत्तमराव जुंबळे,मधुकर भोई ,अतुल जावरे, मंगेश कोळी यांनी परिश्रम घेतले

No comments