जालना महापालिकेच्या आयुक्त पदाचा अंजली शर्मा यांनी स्वीकारला पदभार; पत्नी आयुक्त तर पती सीईओ! रणजित मस्के जालना जि. प्रतिनिधी. (संपादक ...
जालना महापालिकेच्या आयुक्त पदाचा अंजली शर्मा यांनी स्वीकारला पदभार; पत्नी आयुक्त तर पती सीईओ!
रणजित मस्के जालना जि. प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जालना महानगर पालिकेच्या नवीन आयुक्त म्हणून श्रीमती. अंजली कृष्णकांत शर्मा-कनवारिया यांनी जालना महानगर महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. नूतन आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर शहरांतील विकास कामांना प्रशासनांच्या माध्यमांतून गती देणार असे स्पष्ट सांगितले आहे. अंजली शर्मा या सन 2021 बॅचच्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्या नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदलांमध्ये जालना महापालिकेच्या आयुक्तपदी अंजली शर्मा तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कृष्णकांत कनवारिया यांनी पदभार स्वीकारला आहे. जालना जिल्ह्यात हे दोन्ही अधिकारी पती-पत्नी आहेत. त्यामुळे जालन्याचा कारभार आता आयएएस अधिकारी जोडी पाहणार असल्याचे बोलले जात आहे. जालना महापालिकेला जवळपास सहा महिन्यांनी नव्या आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. आणि ही नियुक्ती शिस्तप्रिय महिला आयएएस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे.

No comments