adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आज चौगावात दिप प्रकाश फाऊंडेशन तर्फे महिलांच्या आरोग्य विषयी मार्गदर्शन शिबीर

 आज चौगावात दिप प्रकाश फाऊंडेशन तर्फे महिलांच्या आरोग्य विषयी मार्गदर्शन शिबीर   विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चौगाव:-  आज...

 आज चौगावात दिप प्रकाश फाऊंडेशन तर्फे महिलांच्या आरोग्य विषयी मार्गदर्शन शिबीर  


विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चौगाव:-  आज दि.१२/४/२०२६ रविवारी दुपारी ठिक अडीच वाजता चौगाव येथे दिप प्रकाश फाऊंडेशन तर्फे महिलांचे आरोग्य व आर्थिक सक्षमीकरण, मासिक पाळी,पी सी ओ बी,पी सी ओ एस, गर्भाशयाचे आजार, गर्भधारणा, कॅन्सर मुक्त भारत, डायबेटिस मुक्त भारत व स्वयंरोजगार संधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 सध्या चालत असलेली बदलती जीवनशैली, खानपान,व्यायामाचा अभाव, मानसिक ताण तणाव आणि त्यातच सोशिक स्वभाव याचा सर्वाधिक परीणाम महीलांच्या आरोग्यावर दिसून येत आहे.

आज घरोघरी महीलांना, मुलींना थायराॅईड, मायग्रेन,पी सी ओ डी, अनियमित पाळी, गर्भाशयाचा कॅन्सर,अनेमिया, कॅल्शियम कमतरता, लठ्ठपणा, ब्लडप्रेशर, डायबेटिस अशा अनेक त्रासांना समोर जावे लागत आहे या आणि अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन दिप प्रकाश फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

या शिबिरात अनिता अहिरराव (Rubi Ds Wrm),छाया भामरे भडगाव (Exucative Ds,Wrm) विशाल अहिरराव (Gold DsWrm), अर्चना वाघ(Gold DsWrm ) मार्गदर्शन करणार आहेत.

 तरी या शिबिराचा लाभ चौगाव व परीसरातील महीला व किशोर वयीन मुलींनी घ्यावा असे आवाहन शिबिराच्या आयोजक व दिप प्रकाश फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.दिपमाला सुनील धनगर यांनी केले आहे.

No comments