adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एमपीएससी-यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा; अॅड. उमेश शहादू मराठे यांच्या मागणीला यश, शासनाची अधिकृत घोषणा

 एमपीएससी-यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा; अॅड. उमेश शहादू मराठे यांच्या मागणीला यश, शासनाची अधिकृत घोषणा  विकास पाटील धरणगाव (संपादक...

 एमपीएससी-यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा; अॅड. उमेश शहादू मराठे यांच्या मागणीला यश, शासनाची अधिकृत घोषणा 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : एमपीएससी व यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची अनेक वर्षे तयारी करूनही अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामध्ये अॅड. उमेश शहादू मराठे (The Maratha Law Chambers) यांनी मांडलेल्या मागणीला यश आले असून शासनाने त्याची अधिकृत घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयानुसार, स्पर्धा परीक्षांमध्ये अंतिम टप्प्यावर अपयशी ठरलेल्या उमेदवारांना आता पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. “निपुण सेतु” या नव्या पोर्टलच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची माहिती खासगी तसेच सार्वजनिक संस्थांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे पात्र तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या हजारो तरुणांना अपयशानंतर मोठ्या प्रमाणावर मानसिक व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. 

या पार्श्वभूमीवर अॅड. उमेश शहादू मराठे यांनी अशा उमेदवारांना पर्यायी संधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा सातत्याने मांडला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून शासनाने सकारात्मक भूमिका घेत निर्णय जाहीर केला आहे. या उपक्रमामुळे एकाच वेळी अनेक प्रश्नांवर तोडगा निघणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी केलेल्या उमेदवारांचे ज्ञान व कौशल्य यांचा उपयोग विविध क्षेत्रांत होईल, तसेच त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. अॅड. उमेश शहादू मराठे यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करत सांगितले की, “हा निर्णय हजारो स्पर्धा परीक्षार्थी तरुणांसाठी आशेचा किरण आहे. शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत घेतलेला हा निर्णय समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.” शासनाच्या या निर्णयाचे विविध स्तरांवर स्वागत होत असून, योग्य अंमलबजावणी झाल्यास हा उपक्रम राज्यातील तरुणांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

No comments