वृक्षारोपण करीत डॉ बाबासाहेबांची जयंती साजरी यंदाही १४ वृक्षांचे रोपण माजी सरपंच कालू मिस्तरी यांचा बुध्दनगरी हिरवीगार करण्याचा संकल्प! रा...
वृक्षारोपण करीत डॉ बाबासाहेबांची जयंती साजरी यंदाही १४ वृक्षांचे रोपण माजी सरपंच कालू मिस्तरी यांचा बुध्दनगरी हिरवीगार करण्याचा संकल्प!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही १४ झाडे लावून वृक्षारोपण करीत परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्याचा स्तुत्य उपक्रम बुध्द नगरीतील रहिवाशांच्या कर्तुत्व युक्तीतून राबविला गेला मोठा वाघोदा बुद्रुक गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बस अंकलेश्वर ब्रहानपूर महामार्गावरील बस स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करून रमाई नगर मित्र मंडळातर्फे सामूहिक अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मोठे वाघोदा गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह
गावातील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय विशाल पाटील व कर्मचारी यांची उपस्थित होती. मोठे वाघोदा येथील प्रगतशील शेतकरी श्री डी. के. महाजन , यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रमाई नगरातील बुद्ध नगरी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही
वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. बस स्टैंड परिसरात असलेल्या संविधान फलकाला पुष्पहार करुन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. संघर्ष मित्र मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मित्र मंडळ, रमाई नगर मित्र मंडळ बुद्ध नगरी यांच्यातर्फे दुपारपासून जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दोन दिवस विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न झाले. सायंकाळी गावातून मुख्य मार्गावरून भीम जयंतीच्या घोषणा देत निळे झेंडे फडकवत मिरवणूक काढण्यात आली
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) प्रभारी अधिकारी विशाल पाटील, मा. डी.के. महाजन, मा. किशोर पाटील, डॉ. मनोहर महाजन, मा. बाळु श्रावण महाजन, मा. अनिल सरपंच, माजी सरपंच कालू मिस्तरी मा. श्रावण सिताराम महाजन, राहुल महाजन, कुलदीप पाटील, संजय माळी, महेंद्र काळे, सुरेंद्र शिरनामे मलक अनिस, मुस्तफा मलिक, के.पी ठेकेदार, शेख मुस्ताकीम महमूद, सेट, इस्माईल तडवी, उत्तम वाघ, राजू सावळे आदीसह मान्यवर उपस्थित होते मिरवणुकीत सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप एएस आय विनोद पाटील पोहेकॉ.रमजान तडवी,पोहेकॉ अफजल तडवी पो कॉ अतुल तडवी व गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला व मिरवणूक शांततेत पार पडली

No comments