सीबीएसई दहावी परीक्षेत श्री एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूलचा घवघवीत निकाल प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सीबीएसई बोर...
प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत श्री एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत कृष्णल प्रविण चौधरी याने ९८.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ गार्गी पराग पाटील हिने ९६.०० टक्के गुणांसह द्वितीय, रोहन प्रमोद रोझतकर याने ९४.०० टक्के गुणांसह तृतीय, प्रणव दीपक महाजन याने ९३.०० टक्के गुणांसह चतुर्थ तर दुर्वेश गणेश महाजन याने ९१.०२ टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला. या यशाबद्दल मा. श्री. एकनाथरावजी खडसे तसेच केंद्रीय राज्य मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आणि शाळेचे प्राचार्य श्री. अनिल पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments