स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा थरार..! कत्तलखान्यांवर धाडी टाकून ११ गोवंशीय जनावरांना दिले जीवदान सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकां...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा थरार..! कत्तलखान्यांवर धाडी टाकून ११ गोवंशीय जनावरांना दिले जीवदान
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून,स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (१९ एप्रिल) रोजी पहाटे मोठी कारवाई केली.सोनई आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून पोलिसांनी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे.या कारवाईत एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४ आरोपीं विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली.या पथकात पोउपनि संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शाहिद शेख,रिचर्ड गायकवाड, भिमराज खर्से,सागर ससाणे, रोहित येमुल,भगवान थोरात, रमिजराजा आत्तार,विशाल तनपुरे आणि चालक उत्तरेश्वर मोराळे यांचा समावेश होता.
दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे
१. चांदा (सोनई हद्द):
पथकाने नेवासा तालुक्यातील चांदा येथे छापा टाकला. तेथे ९० हजार रुपये किमतीची ६ गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयतेने डांबून ठेवल्याचे आढळले. याप्रप्रकरणी आसिफ आतीक कुरेशी, लियाकत इस्माईल कुरेशी आणि उबेद कुरेशी (सर्व रा. चांदा) यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. १३८/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
२. झेंडीगेट (कोतवाली हद्द):
दुसरी कारवाई अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट भागातील सुभेदार गल्लीत करण्यात आली. येथे १ लाख २ हजार रुपये किमतीची ५ जनावरे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी सुफियान आयाज कुरेशी याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. २५९/२०२६) दाखल केला आहे.
आरोपी फरार,पोलिसांचा शोध सुरू या दोन्ही कारवायांमध्ये आरोपी पोलिसांची चाहूल लागताच फरार झाले आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम (सुधारीत २०१५) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याच्या कायद्यानुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments