डॉ. मंगेश गोंदावले यांनी गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला; तर जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची पुणे येथे बदली! (गोंदिया जिल्हा ) ...
डॉ. मंगेश गोंदावले यांनी गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला; तर जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची पुणे येथे बदली!
(गोंदिया जिल्हा ) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गोंदियाचे नूतन जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी मावळते जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याकडून पदभार स्वीकारला असून. जिल्हाधिकारी यांनी पदभार घेताच आदिवासी बहुल जिल्ह्याच्या विकासावर आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर प्रथम प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले हे 2015 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. तर जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांनीही आपल्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्याचा औद्योगिक विकास आणि आदिवासी कल्याण यावर चांगलाच भर दिला होता. गोंदिया जिल्हाधिकारी पदभार घेतल्यापासून प्रजित नायर नेहमीच प्रयत्नशील गोंदियाकरांना दिसून आल्यामुळे त्यांनी गोंदियाकरांना जाताना भावनिक संदेश दिला गोंदिया जिल्हा माझ्या कायम मनामध्ये राहील, कार्यालयातील व सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून चांगले सहकार्य मिळाले त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात काम करताना मला चांगल्या कामाची पोचपावती मिळाली आहे.

No comments