adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाऊले चालती पंढरीची वाट..सुखी संसाराची सोडुनिया गाठ चोपडा ते पंढरपूर संकीर्तन पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन.. (वारकऱ्यांनी ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा..दिंडी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन)

 पाऊले चालती पंढरीची वाट..सुखी संसाराची सोडुनिया गाठ  चोपडा ते पंढरपूर संकीर्तन पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन.. (वारकऱ्यांनी ह्या सुवर्णस...

 पाऊले चालती पंढरीची वाट..सुखी संसाराची सोडुनिया गाठ 

चोपडा ते पंढरपूर संकीर्तन पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन..

(वारकऱ्यांनी ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा..दिंडी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन) 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:- श्रीक्षेत्र, विठ्ठल मंदिर चोपडा व चिंचोली पासून श्रीक्षेत्र, विठ्ठल मंदिर पंढरपूर पर्यंत नियोजित श्री.रामकृष्णहरी वारकरी सेवा मंडळ चोपडा संकल्पित आषाढी वारी निमित्त संकिर्तन पायी पालखी (प्रथम वर्ष) दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ह्या दिंडीत तालुका व जिल्हाभरातील शेकडों वारकरी सहभागी होणार आहेत. दि.२६ जुन रोजी रात्री ८ वा. श्री.विठ्ठल मंदिर चोपडा येथे ह.भ.प.श्री.संजीव महाराज (गलवाडेकर) यांचे दिंडी प्रस्थान निमित्त जाहीर किर्तन होईल. दिंडी कार्यास सर्व स्तरातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे.

         रामायणकार आद्यकवी गुरुदेव महर्षी वाल्मिक ऋषींची पालखी, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा झेंडा व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता सोबत घेऊन दिंडीचे २७ जून रोजी स.८ वा. चोपडा येथुन प्रस्थान होणार आहे. दिंडीचा चोपडा ते पंढरपूर दरम्यान २२ गावात मुक्काम राहणार आहे. दररोज वारकऱ्यांना सरासरी २० कि.मी. अंतर चालावे लागणार आहे. दिंडीचा पंढरपुरात आठ दिवसांचा मुक्काम राहील. त्या दरम्यान सकाळी श्री.रूख्मिणी देवी मंदिराच्या प्रथम महिला पुजारी ह.भ.प.श्रीमती.उर्मिलादेवी भाटे (पंढरपूर) यांची श्री देवीभागवत कथा, दुपारी ग्रामगीतेचे प्रचारक जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांची ग्रामगीता कथा, रात्री ह.भ.प.रघुनाथ महाराज (बुलढाणा) यांच्या श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

           दिंडीची सांगता दि.२६ जुलै रोजी सकाळी ह.भ.प.सौ.माधुरीताई सोनवणे (गलवाडेकर) यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. संगीतसाथ हातेड खुर्द येथील श्री माऊली भजनी मंडळ, कोळंबा येथील श्रीगुरूदेव भजनी मंडळ, चिंचोली येथील श्री वारकरी भजनी मंडळ, गोरगावले येथील म.वाल्मिकी भजनी मंडळ यांची लाभणार आहे. दिंडीत वारकऱ्यांना चांगल्या प्रकारची सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणून वारकऱ्यांनी ह्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन दिंडीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामगीता ग्रंथवाचक / प्रचारक व दिंडीचे संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावलेकर) यांनी केले आहे.

No comments