भयाण शांतता कचरा डेपोत लाखोंचा जुगार..एमआयडीसी पोलिसांनी उद्ध्वस्त केला तिरट जुगाराचा अड्डा सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायक...
भयाण शांतता कचरा डेपोत लाखोंचा जुगार..एमआयडीसी पोलिसांनी उद्ध्वस्त केला तिरट जुगाराचा अड्डा
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने नवनागापूर परिसरात चालणाऱ्या 'तिरट' नावाच्या हार-जितीच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ७२ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण ११ जणांना ताब्यात घेतले आहे, तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.दि.११ मे २०२६ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिकराव चौधरी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,नवनागापूर येथील बंद पडलेल्या कचरा डेपोमध्ये काही इसम लाईटच्या उजेडात पैसे लावून जुगार खेळत आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कचरा डेपोच्या मोकळ्या जागेत छापा टाकला.पोलिसांनी घटनास्थळावरून सुंदर ऊर्फ विकास विजय खंडागळे,शुभम नरेंद्र दायमा,प्रदीप भाऊसाहेब कोहक,सोफियान रौफ कुरेशी, अमन हमीद शेख,सुरेश शिवराम नन्नवरे,इब्राहिम इक्बाल बेग, योगेश तानाजी घोरपडे,दत्तात्रय शंकर येवले,किशोर कचरू शिंदे आणि किरण प्रभाकर पानपाटील अशा ११ जणांना ताब्यात घेतले आहे.या छाप्यात पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ३,७२,६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिक बी.चौधरी,पोसई.विकास जाधव, सफौ.फकीर शेख,सफौ.शिंदे, पोहेकॉ.राजू सुद्रिक,पितळे, आढाव, किशोर जाधव,सचिन हरदास, सूरज देशमुख, अक्षय रोहोकले आणि शेरकर यांच्या पथकाने केली आहे.

No comments