adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चुंचाळे ते उजाळ कर्जाने रस्त्यासाठी 12.57 कोटींची मंजुरी; आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन

  चुंचाळे ते उजाळ कर्जाने रस्त्यासाठी 12.57 कोटींची मंजुरी; आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन चोपडा प्रतिनिधी :- (संपादक :- हेमका...

 चुंचाळे ते उजाळ कर्जाने रस्त्यासाठी 12.57 कोटींची मंजुरी; आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन



चोपडा प्रतिनिधी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


चोपडा विधानसभा मतदारसंघातील चुंचाळे ते उजाळ कर्जाने या 7.5 किलोमीटर लांबीच्या महत्त्वाच्या रस्त्यासाठी आमदार निधीतून तब्बल 12 कोटी 57 लाख रुपयांची मंजुरी मिळाली असून दि.16 मे 2026 रोजी या कामाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.या विकासकामासाठी चोपडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे तसेच माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

उद्घाटन प्रसंगी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच रस्त्याच्या कामाबाबत माहिती घेत चर्चा केली. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असून वाहतुकीला मोठी मदत मिळणार आहे.

गावकऱ्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “चुंचाळे ते कर्जाने असा दर्जेदार रस्ता होईल, असा विचारही आम्ही कधी केला नव्हता.” या विकासकामाबद्दल ग्रामस्थ व शिवसैनिकांनी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी कृषी उत्पन्न समिती चोपडा चे सभापती नेरेंद्र पाटील,देवा पाटील,लोटन कुमावत,संजय बाबाजी,नंदू चौधरी,नाना छगन,लीलाधर गुरुजी,धना बापू,पंढरी बापू, मनोहर कोळी,दत्तू सुखा पाटील,माधव झावरू पाटील, खुशाल कुमावत, किरण कुमावत, लक्ष्मण पाटील,बबलू पाटील, दिलीप पाटील,नितीन पाटील,राजू पाटील,संजू पाटील,किशोर पाटील,संजय कुमावत,आनंदा रामू,भाऊसाहेब मराठे,बाळू,छोटू यांच्यासह गावातील शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

No comments