adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विद्याभारती माध्यमिक विद्यालय विरवाडेचा दहावीचा निकाल 80.32 टक्के; देवयानी सोनगिरे प्रथम

विद्याभारती माध्यमिक विद्यालय विरवाडेचा दहावीचा निकाल 80.32 टक्के; देवयानी सोनगिरे प्रथम  विरवाडे ता.चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...

विद्याभारती माध्यमिक विद्यालय विरवाडेचा दहावीचा निकाल 80.32 टक्के; देवयानी सोनगिरे प्रथम 


विरवाडे ता.चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

विरवाडे : विद्याभारती माध्यमिक विद्यालय, विरवाडे येथील विद्यार्थ्यांनी यंदाच्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 80.32 टक्के लागला असून परीक्षेला प्रविष्ट झालेल्या 61 विद्यार्थ्यांपैकी 51 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी दोन विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष यश मिळविले. विद्यालयातून कु. देवयानी ज्ञानेश्वर सोनगिरे हिने 92.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. देवयानी ही अखिल भारतीय जिवा सेनेचे चोपडा तालुका उपाध्यक्ष तथा सातपुडा विरवाडे वसतिगृहाचे अधीक्षक ज्ञानेश्वर रमेश सोनगिरे (चौगाव) यांची कन्या आहे.
तसेच कु. पुनम अंबादास पाटील हिने 91.20 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. जयेश रवींद्र कोळी याने 85.00 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक, मोहित रामदास सपकाळे याने 84.20 टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक तर मनीष जयपाल पवार याने 80.20 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्याभारती बहुउद्देशीय शिक्षण मंडळ विरवाडेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ, सातपुडा आदिवासी मागासवर्गीय वसतिगृहाचे अधीक्षक, शिपाई, स्वयंपाकी, मुख्याध्यापक तसेच शिक्षक व कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments