adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हातेडच्या श्री शिवाजी हायस्कूलचा दहावी निकाल जाहीर; तनुश्री सोनवणे ठरली अव्वल

 हातेडच्या श्री शिवाजी हायस्कूलचा दहावी निकाल जाहीर; तनुश्री सोनवणे ठरली अव्वल  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:–  तालुक्...

 हातेडच्या श्री शिवाजी हायस्कूलचा दहावी निकाल जाहीर; तनुश्री सोनवणे ठरली अव्वल 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:–  तालुक्यातील हातेड येथील श्री शिवाजी हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाचा एकूण निकाल 64.70 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत भर घातली आहे.

यंदाच्या निकालात कु. तनुश्री प्रवीण सोनवणे हिने 85.60 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. कु. मानसी कैलास सनेर हिने 75.80 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. कोमल प्रशांत सोनवणे हिने 75.00 टक्के गुण मिळवत तृतीय स्थान प्राप्त केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे मानद सचिव निलेशजी भोईटे, स्कूल कमेटीचे चेअरमन अॅड. सुरेश आनंदराव सोनवणे, मुख्याध्यापक पी. सी. पाटील, पर्यवेक्षक पी. आर. पाटील यांच्यासह एम. पी. सांगळे, एम. आर. पाटील, जी. बी. पाटील सर, प्रविण सोनवणे सर,आर. एल. तायडे, के. आर. पाटील मॅडम, एस. आर. शिंदे मॅडम, संचालक मंडळ, शिक्षकवृंद व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments