कु. संस्कृती प्रकाश पुरीगोसावी हिची दहावीत भरारी; घवघवीत यशाने सर्वांची मने जिंकली! (सातारा जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी. (स...
कु. संस्कृती प्रकाश पुरीगोसावी हिची दहावीत भरारी; घवघवीत यशाने सर्वांची मने जिंकली!
(सातारा जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप येथील कु: संस्कृती प्रकाश पुरी गोसावी ही इयत्ता 10 वी मध्ये घवघवीत यशाने सर्वांची मने जिंकली आहेत. कु: संस्कृती प्रकाश पुरी गोसावी ही मूळची करंजखोपची पण माण तालुक्यातील दहिवडी नगरीत वास्तव्यास असून ती जय भवानी विद्यालय (पिंगळी बुद्रुक) येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. कु: संस्कृती प्रकाश पुरी गोसावी हिने इयत्ता 10 वी मध्ये आपल्या मेहनतीच्या बळावर 72.80 भरारी गुणांनी इयत्ता 10 वी मध्ये घवघवीत यशाने सर्वांची तिने मने जिंकली आहेत. संस्कृतीने इयत्ता पहिलीपासून आपल्या शालेय शिक्षण क्षेत्रात नेहमीच भरारी दाखवली आहे. पुरी गोसावी कुटुंबात दमदार नेतृत्व म्हणून संस्कृतीला चांगलेच ओळखले जाते. कुटुंबातील आणि सर्वांशी अगदी शालेय सेवकांशीही प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने तिला ओळखले जाते. इथून पुढेही सुरू असणाऱ्या शिक्षणामध्ये देखील कायमच भरारी यश दाखवणार आहे. संस्कृतीच्या या भरारी घवघवीत यशाबद्दल पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी आपल्या रोखठोक महाराष्ट्र धमाका ग्रुप कडून तसेच सर्व पत्रकार बांधव प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.

No comments