धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूरचा बारावी निकाल 93.75% : विज्ञान शाखेत 98.89% निकाल इदू पिंजारी फैजपूर : (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूरचा बारावी निकाल 93.75% : विज्ञान शाखेत 98.89% निकाल
इदू पिंजारी फैजपूर :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूर येथील इयत्ता बारावीचा 2026 चा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयाने यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. एकूण निकाल 93.75 टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल 98.89 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. श्रेया सुभाष शेकदार हिने 78% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. पलक रोकेश तरळेजा हिने 75.17% गुणांसह द्वितीय स्थान मिळवले, तर पूर्वा मिलिंद चौधरी हिने 74.83% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वाणिज्य शाखेचा निकाल 79.17 टक्के लागला आहे. या शाखेत ओजस्वी चेतन बोंदे हिने 75% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. कृष्णा रमेश कुंकुंजा याने 77.17% गुणांसह द्वितीय स्थान मिळवले, तर अर्णव उत्पल चौधरी याने 74% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
कला शाखेचा निकाल 79.82 टक्के लागला असून ईशान नंदकिशोर पाटील याने 79% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. रोहित रहिमान तडवी याने 62.33% गुणांसह द्वितीय स्थान मिळवले, तर गिरीश कैलास चव्हाण याने 50% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्री. शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष श्री. एस. के. चौधरी, श्री. मिलिंद शंकरराव वाघुळे, चेअरमन श्री. तिलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव श्री. एम. टी. फिरके, व्हा. चेअरमन प्रा. के. आर. चौधरी तसेच सहसचिव प्रा. नंदकुमार भंगाळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळे, पर्यवेक्षक प्रा. उत्पल एल. चौधरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments