adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सब-स्टेशन वरील सशस्त्र दरोड्याचा छडा..५० हून अधिक गुन्हे करणारा अट्टल दरोडेखोर 'म्हस्के' LCB कडून जेरबंद!..

 सब-स्टेशन वरील सशस्त्र दरोड्याचा छडा..५० हून अधिक गुन्हे करणारा अट्टल दरोडेखोर 'म्हस्के' LCB कडून जेरबंद!..  सचिन मोकळं अहिल्यानगर ...

 सब-स्टेशन वरील सशस्त्र दरोड्याचा छडा..५० हून अधिक गुन्हे करणारा अट्टल दरोडेखोर 'म्हस्के' LCB कडून जेरबंद!.. 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :- शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील एम.एस.ई.बी.(MSEB) सब-स्टेशनवर मध्यरात्री सशस्त्र हल्ला चढवून दहशत निर्माण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी टोळीचा म्होरक्या आणि महाराष्ट्रातील कुख्यात गुन्हेगार भीमा लक्ष्मण म्हस्के याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि चोरीचे साहित्य असा एकूण ५ लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.२२ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री चापडगाव येथील एम.एस.ई.बी. सब-स्टेशनवर चार ते पाच जणांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला होता. कर्तव्यावर असलेल्या वॉचमनला (गोकुळ संपत मडके) लाकडी दांडके आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करून चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरची तोडफोड केली. या टोळीने तिथून ९९० लिटर ऑईल आणि ५३० किलो कॉपर कॉईल असा सुमारे १ लाख रुपयांचा माल लंपास केला होता. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांचे जाळे विणले. बीडचा अट्टल गुन्हेगार भीमा म्हस्के हा आपल्या साथीदारांसह स्विफ्ट कारमधून (MH 12 GK 4927) शेवगाव परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी वरुरु चौकात सापळा रचला.अत्यंत शिताफीने संशयास्पद कार अडवून तिघांना ताब्यात घेण्यात आले.भीमा लक्ष्मण म्हस्के (वय ३८, रा. बलभीमनगर, बीड,ज्याच्यावर ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.अविनाश कल्याण धुरंधरे (वय ३७, रा. चांदणेवस्ती, बीड),अमोल गणेश रांजवण (वय ३६, रा. माळेगल्ली, बीड) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

स्विफ्ट कार: ५,००,०००/- रुपये

कॉपर कॉईल (१० किलो): ३०,०००/- रुपये

मोबाईल संच (३ नग): ४१,१००/- रुपये

चोरीचे साहित्य: १,६००/- रुपये

एकूण किंमत: ५,७२,७००/- रुपये,ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता,त्यांनी चापडगाव येथील एका जिनींग प्रेस मधील डी.पी. फोडून देखील चोरी केल्याची कबुली दिली.या गुन्ह्यात सुरेश उद्धव चांदणे आणि नाना सुदाम सुतार (रा.बीड) यांचाही सहभाग असल्याचे समोर आले असून, पोलीस आता त्यांच्या शोधात आहेत. या कारवाईमुळे शेवगाव पोलीस ठाण्यातील दोन अत्यंत गंभीर गुन्हे एकाच वेळी उघडकीस आले आहेत.ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक  यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.हरिष भोये,पोउपनि.महादेव गुट्टे, फुरकान शेख,बाळासाहेब नागरगोजे,शाहिद शेख,आकाश काळे,बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ,भगवान धुळे व सोनल भागवत यांच्या पथकाने केली आहे.पोलीस प्रशासनाचे आवाहन: अशा प्रकारच्या टोळ्यांपासून सावध राहण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी व सुरक्षा रक्षकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांशी संपर्क साधावा.

No comments