adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कामगार दिनी खेर्डी मधील सफाई कामगारांचा सन्मान समारंभ

 कामगार दिनी खेर्डी मधील सफाई कामगारांचा सन्मान समारंभ  चिपळूण प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चिपळूण:- महाराष्ट्र दिन कामगार दिन राज...

 कामगार दिनी खेर्डी मधील सफाई कामगारांचा सन्मान समारंभ 


चिपळूण प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चिपळूण:- महाराष्ट्र दिन कामगार दिन राजभाषा दिन अशा तिहेरी दिनांचे औचित्य साधून चिपळूण येथील स्नेहबंध मंच या संस्थेने खेर्डी ग्रामपंचायत मधील 10 सफाई कामगारांचा भेटवस्तू, शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. सदर समारंभ स्नेहबंध मंच चिपळूणचे अध्यक्ष सिताराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खेर्डी ग्रामपंचायतच्या मिटींग हॉलमध्ये पार पडला. सदर समारंभात विपूल दाते, अविनाश उतेकर, संदेश ठसाळे, संतोष खेडेकर, प्रवीण पवार, मंगेश कुंभार, अक्षय उतेकर, पांडुरंग वाडकर, रोहित भूरण व मंगेश पवार या सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला.

सफाई कामगारांचा सन्मान करताना अध्यक्ष सिताराम शिंदे व संचालक मंडळ

तळागाळातील कामगार गावची शहराची सफाई करतात. म्हणून आपले आरोग्य उत्तम राहते. या भावनेतूनच या सफाई कामगारांचा गौरव करणे. हे आपले आद्य कर्तव्य आहे. असे सांगून गतवर्षीही या संस्थेने घरकाम करणा-या घरेलू कामगारांचाही गौरव केला होता. ही संस्था गेली दोन वर्षे असे विविध उपक्रम राबवित आहे. उदा. घरेलू कामगारांची आरोग्य तपासणी, निराधार आश्रितांना सहाय्य, आदिवाशी बांधवांना कपडे वाटप, शाळा व ग्रंथालय याना वाचनासाठी पुस्तके भेट, विद्यार्थ्यांना वहया वाटप, नारी सन्मान, जागतिक महिला दिन असे विविध उपक्रम राबवित आहे. असे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. सदर समारंभास किसन सहकारी बँकेचे चेअरमन चंद्रकांत मांडवकर, स्नेहबंध चे उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, सचिव विकास ढवण, संचालक विजय थोरे, अरुण कदम, विनायक घटे, संचालिका प्रणिता धामणस्कर, अमिता मोमीन व श्रध्दा जाधव उपस्थित होते. सदर समारंभाचे सूत्रसंचलन व आभार विजय थोरे यांनी केले.

No comments