जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी नवीन फौजदारी कायद्यांवर कार्यशाळा संपन्न.... जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:- हे...
जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी नवीन फौजदारी कायद्यांवर कार्यशाळा संपन्न....
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे दि. ३ मे रोजी पत्रकार बांधवांसाठी नवीन फौजदारी कायदे या विषयावर जळगाव पोलीस दलाच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी कार्यशाळेचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यशाळेत भारतीय न्याय प्रणालीतील अलीकडील बदलांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रेरणा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत उपस्थित होते. या कार्यशाळेत नवीन फौजदारी कायदे- भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) - याबाबत पोलीस निरीक्षक आर.टी. धारबळे यांनी नवीन फौजदारी कायदा या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. नव्या कायद्यांमधील महत्त्वाचे बदल, गुन्हे नोंदणी प्रक्रिया, तपास पद्धतीतील सुधारणा आणि न्यायालयीन प्रक्रियेतील बदल यांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले. कार्यक्रम सादरीकरणासाठी PPT फाईलचा वापर करण्यात आले ज्यामुळे उपस्थित पत्रकार बांधवांना अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत झाली. तसेच, या कार्यशाळेमुळे पत्रकारांना नवीन कायद्यांविषयी माहिती मिळाली असून, गुन्हेगारी बातम्या अधिक अचूक व पूर्ण माहिती पद्धतीने सादर करण्यास मदत होईल या भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच डीवायएसपी प्रशांत दरेकर, एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि इतर कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.

No comments