चिचारी येथे प्रशांत डिक्कर यांच्या उपस्थितीत आदिवासी शेतकऱ्यांचा निर्धार, प्रलंबित प्रश्नांवर 'स्वराज्य' पक्ष देणार साथ. अमोल बावस...
चिचारी येथे प्रशांत डिक्कर यांच्या उपस्थितीत आदिवासी शेतकऱ्यांचा निर्धार, प्रलंबित प्रश्नांवर 'स्वराज्य' पक्ष देणार साथ.
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
संग्रामपूर - तालुक्यातील चिचारी येथे स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि .३ मे रोजी शेकडो आदिवासी शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, संकटाच्या काळात खचून न जाता संघर्षाची तयारी ठेवण्याचे आवाहन डिक्कर यांनी केले.
सध्याचा काळ संघर्षाचा असला तरी आगामी दिवस शेतकऱ्यांचेच असतील, असा विश्वास प्रशांत डिक्कर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, "पेरणीपूर्व मशागत, आणि बियाणे उपलब्धेसाठी स्वराज्य पक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येईल. आदिवासी शेतकऱ्यांची ढासळलेली आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी आपला पक्ष सदैव तत्पर आहे.
शेतकऱ्यांनी कोणत्याही संकटात हतबल होऊ नये. जिथे अन्याय किंवा संकट दिसेल, तिथे केवळ एक हाक द्या, स्वराज्य पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या बैठकीमुळे परिसरातील आदिवासी बांधवांमध्ये नवीन उमेद निर्माण झाली आहे. या बैठकीला महा ॲग्रो एफपीसीच्या प्रोजेक्ट डायरेक्टर भारतीताई ताकसांडे, हरिश केदार, हम्मद केदार, फकिरा केदार, बहादूर केदार, रसुल केदार, वझीर केदार, हमिद पाले, रमजान केदार यांच्यासह चिचारी परिसरातील शेकडो आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments