स्वगणना आयडी दाखवा अन् मोफत वॉटर बॉटल मिळवा; आनंद सुपर शॉपीचा जनगणना २०२७ मोहिमेला हातभार चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जन...
स्वगणना आयडी दाखवा अन् मोफत वॉटर बॉटल मिळवा; आनंद सुपर शॉपीचा जनगणना २०२७ मोहिमेला हातभार
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी तिरंगा चौक येथील आनंद सुपर शॉपीचे संचालक चेतन टाटिया यांनी अभिनव सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. स्वगणना पूर्ण करून Self Enumeration ID दाखविणाऱ्या चोपडा शहरातील नागरिकांना मोफत वॉटर बॉटल भेट देण्यात येणार आहे.
भारत सरकारच्या जनगणना २०२७ मोहिमेअंतर्गत नागरिकांनी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वतःची स्वगणना करावयाची आहे. या राष्ट्रीय उपक्रमात नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा, यासाठी आनंद सुपर शॉपीतर्फे हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
स्वगणना पूर्ण केल्यानंतर नागरिकांना मिळणारा Self Enumeration ID आनंद सुपर शॉपी येथे दाखवल्यानंतर त्यांना मोफत वॉटर बॉटल देण्यात येणार आहे. “देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी स्वगणना मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन चेतन टाटिया यांनी केले आहे.
याबाबत बोलताना जनगणना २०२७ चे चार्ज अधिकारी रामनिवास झंवर यांनी सांगितले की, “जनगणना ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा मजबूत पाया आहे. आनंद सुपर शॉपीने राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. इतर व्यापारी, व्यावसायिक तसेच सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेऊन नागरिकांना स्वगणनेसाठी प्रोत्साहित करावे.”
ते पुढे म्हणाले की, “स्वगणना मोहिमेचे आता अवघे चार दिवस शिल्लक असून सर्व नागरिकांनी तात्काळ स्वगणना पूर्ण करून देशाच्या विकासात आपला सहभाग नोंदवावा.”
जनगणना २०२७ ही देशाच्या नियोजन, विकास आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
No comments