adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यात अवैध गावठी कट्टे व शस्त्रसाठ्यावर पोलिसांची धडक कारवाई; दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

चोपडा तालुक्यात अवैध गावठी कट्टे व शस्त्रसाठ्यावर पोलिसांची धडक कारवाई; दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात चोपडा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमका...

चोपडा तालुक्यात अवैध गावठी कट्टे व शस्त्रसाठ्यावर पोलिसांची धडक कारवाई; दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रसाठ्याविरोधात मोठी कारवाई करत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या ताब्यातून गावठी बनावटीचा कट्टा,जिवंत काडतुसे,मोबाईल फोन तसेच दुचाकी असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २० मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बोरअजंटी शिवारातील वैजापूर ते चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर, बोरअजंटी फॉरेस्ट नाक्याजवळ करण्यात आली.

या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांपैकी एकाचे वय १७ वर्षे १० महिने असून तो भुसावळ परिसरातील रहिवासी आहे, तर दुसरा १६ वर्षे ६ महिने वयाचा असून तोही भुसावळ येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा, ५ हजार रुपये किमतीची पाच जिवंत काडतुसे, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन तसेच सुमारे ७० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विविध कंपन्यांची सिमकार्ड असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत पो.कॉं.किरण पारधी,पो.कॉं.विनोद पवार,पो.कॉं.शुभम पाटील, पो.कॉं.रामचंद्र चौधरी आदींनी सहभाग घेतला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बापू साळुंखे करीत आहेत.

No comments